जळगाव- रोहनवाडी भागात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुका पोलिसांनी शुक्रवारी प्रेमीयुगुलास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. ते विदर्भातील कारंजा लाड येथील आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, मी सज्ञान असून त्याने मला नव्हे तर मीच त्याला पळवून आणल्याचे युवतीने ठणकावून सांगितल्यानंतर पोलिसही अवाक झाले.
कारंजा लाड येथील तरुण-तरुणींचे एकमेकांवर सन २०१३ पासून प्रेम आहे. दोघेही शेजारी राहतात. तरुणाचे कपड्यांचे दुकान आहे. तो वडील सावत्र आईसोबत राहतो. त्याची आई जळगावला रोहनवाडीत राहते. दोघांच्या लग्नाला युवतीच्या घरच्यांनी नकार दिला. त्यामुळे २६ जून रोजी रात्री दोघांनी कारंजा लाड येथून पलायन केले. तरुणाची आई जळगावातील रोहनवाडी येथे राहते. दोघेही तेथे आले. तेव्हापासून ते रोहनवाडीत आहेत. तरुणी हरवल्याबाबत तिच्या पालकांनी कारंजा लाड येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी रोहनवाडीत अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याचे कुणी तरी तालुका पोलिसांना कळवले. त्यावरून पोलिसांनी रोहनवाडी येथून या प्रेमीयुगुलास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सविस्तर हकीकत सांगितली. युवती बिनधास्तपणे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत होती. पोलिस उपनिरीक्षक सारिका कोडापे यांनी त्यांची चौकशी केली. दरम्यान, तालुका पोलिसांनी कारंजा लाड पोलिसांशी संपर्क साधला असून प्रेमीयुगुलास त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
अवघ्या सात दिवसांपूर्वी युवती झाली सज्ञान
प्रेमीयुगुलानेपोलिसांना खात्रीसाठी शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्डही दाखवले. दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले. युवकाची आईही पोलिस ठाण्यात आली होती. दोघे शुक्रवारी लग्न करणार होते. त्यासाठी ते वकिलांकडेही गेले होते. मात्र, काही कागदपत्रे नसल्याने विवाह होऊ शकला नाही. ३० जून रोजीच तिला १८ वर्ष पूर्ण झाले आहेत.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











