👁 11 Views

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता….

‘गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला॥’ या जयघोषात गोपाळपूर दुमदुमून गेले होते. 

पंढरपूर-
गोपाळपूर (पंढरपूर) येथे गोपाळकाल्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे चार वाजल्यापासून पालख्या व दिंड्यांनी गोपाळकाल्यासाठी रीघ लावली होती.
‘गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला॥’ या जयघोषात गोपाळपूर दुमदुमून गेले होते. ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या सात पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता झाली.
संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत गोरोबा, संत जनाबाई, संत सोपानकाका, संत नामदेव, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत नरहरी सोनार यांच्या पालख्यांसह अन्य संतांच्या पालखीचे गोपाळपुरात आगमन झाल्यानंतर व पालखी विसावल्यानंतर गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने पूजा करण्यात आली.
श्री विठ्ठलाची आणि संतांची भेट!
पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर मानाच्या सात पालख्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. आषाढी वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.
मानाच्या सात पालख्यांत संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू संत तुकाराम महाराज या मानाच्या सात पालख्या आहेत.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *