👁 10 Views

गणेश गायकवाड ‘कवी कालिदास पुरस्काराने’ सन्मानित

प्रतिनिधी/पंढरपूर
          कवी कालिदास मंडळ बार्शी यांच्यावतीने देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा कविता पुरस्कार आंबे, ता- पंढरपूर येथील  कवी गणेश गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे, त्यांच्या ‘माणूस होऊया’ या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, गेल्या पंचवीस वर्षांपासून कवी कालिदास मंडळ हे पुरस्कार अविरतपणे देत आहे, या वेळी जेष्ठ कवी सिराज मोमीन, काशिनाथ गवळी, यांना ही त्यांच्या साहित्यकृतींसाठी सन्मानित करण्यात आले, सदर सोहळा स्वामी समर्थ फंक्शन हॉल बार्शी येथे सुप्रसिद्ध साहित्यिक संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला,
        गणेश गायकवाड यांचा याआधी ‘बाप म्हणतोय पोराला’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहे, त्याचबरोबर ‘भूक’ हा कथासंग्रह व ‘पेनाच्या शाईमधून’ हा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे, त्यांच्या या सन्मानाबद्दल, आ. दत्तात्रय सावंत शिवाजीराव बागल,देवानंद सोनटक्के, चांगदेव कांबळे, राजाराम राठोड, सुभाष कदम, रवी सोनार, कल्याण शिंदे राजेंद्र झुंबर भोसले, अंकुश गाजरे, हरिश्चंद्र पाटील, दादासाहेब खरात, सचिन कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, आदी साहित्यिक व साहित्य प्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले.


  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *