👁 10 Views

पंढरपूर शहरामध्ये भारताचे चलन असलेले दहा रुपयाचा नाणे बाजारपेठेमध्ये न स्वीकारण्यावर कारवाई करा- मनसे व सामाजिक कार्यकर्ते संघटना.

प्रतिनिधी पंढरपूर

संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या चलनात आणलेल्या दहा रुपयांचा ठोकळा (नाणे ) बंद झाला आहे. अशी फार मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये अफवा पसरलेली आहे म्हणून दहा रुपयाचा ठोकळा (नाणे) ज्या माणसाकडे आहे त्या माणसाला तो चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे.

सध्या पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारी यात्रा पार पडली आहे, या यात्रे दरम्यान शहरातील बँक , व्यापारी वर्ग, दुकानदार, लहान मोठे उद्योग करणाऱ्या लोकांनी १० रु याचे नाणे स्वीकारणे अमान्य केले आहे, या अशा परिस्थिती मुळे शहरातील लोक तसेच ग्रामीण भागातील जनता, तसेच वारीला येणारे भाविकभक्त वारकरी आशा या नाहक त्रासाला बळी पडले आहेत.

अनेक बँक व पिग्मी कर्मचारी यांनी १० रु चे नाणे स्वीकारणेस नकार देत आहेत.  त्यामुळे शहरातील जनात संभ्रमात आहे. बँकेच्या अनेक शाखान मध्ये चलन स्वीकारण्याची नोटीस लावली गेली आहे परंतु संबंधित बँकेतील कर्मचारी १० रु नाणे हे चलन स्वीकारत नाहीत. तसेच शहरातील काही बँकामध्ये आशा प्रकारची नोटीस लावली गेली नाही.

तर या संपूर्ण घटने मुळे जनता त्रस्त आहे.
तरी १० रु नाणे चलन न स्वीकारणाऱ्या सर्व बँक, व्यापारी वर्ग दुकानदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आशा मागणीचे निवेदन पंढरपूरचे नायब तसीलदार तिटकारे यांच्या कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांनी केले आहे. या मागणीचा लवकरात लवकर पाठपुरावा करावा अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन देताना मनसे पंढरपूर शहर विभाग प्रमुख अमोल घोडके, सामाजिक कर्यकर्ते श्रीनिवास उपळकर, स्वप्नील (भाऊ) टमटम, शहाजी शिंदे, अनिरुद्ध परदेशी, अजित कांबळे, वैभव निकम, किरण डावरे, रोहित यादव, नागनाथ संपताळ, प्रकाश खटकाळे तसेच कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


  















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

 

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *