👁 10 Views

वारीनंतरची पंढरी…!! आसमंतात पसरलेली दुर्गंधी.. श्वास गुदमरतो पंढरपूरकरांचा…!!!

पंढरपूर Live स्पेशल रिपोर्ट
(भगवान वानखेडे)
पंढरपूर शहरातील बहुतांश नागरिक वारीनंतर आजारी पडतात. ही बाब नवीन नाही. या आषाढी वारीत सुध्दा प्रशासनाने उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करूनही तसेच विविध भागात वारक-यांसाठी शौचालयाची व्यवस्था करूनही अनेक वारकरी उघड्यावरच शौचास बसलेले आढळून आले. परिणाम स्वरूप पंढरपूर शहर व परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

गोपाळपूर रोडवरचे तालुका क्रीडा कार्यालयाचे संपुर्ण आवार, चंद्रभागा बसस्थानक या भागात मोठमोठी सुलभ शौचालय असूनही अनेक वारक-यांनी उघड्यावर शौचास बसणेच पसंद केले.

याबरोबरच उपनगरातील अनेक मोकळ्या जागेत उघड्यावर वारक-यांनी शौचास बसणे पसंद केल्याचे दिसते. पंढरपूर शहरात व परिसरात यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक नागरिक व्हायरल इन्फेक्शन मुळे आजारी पडत आहेत. विविध दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची गर्दी वाढत आहे.

मोठा पाऊस झाला तरच शहर व परिसर स्वच्छ होईल. परंतु अद्याप तरी असा मोठा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता संपूर्ण पंढरपूरकरांना एखाद्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागुन राहिली आहे.

गरज आहे प्रशासनाने यावर उपाययोजना करण्यासोबतच वारक-यांनीही उघड्यावर शौचास बसण्याची आपली मानसिकता बदलण्याची..!!

  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *