लवकरच जिओची नवी सेवा, 100 Mbps स्पीडमध्ये 100 जीबी डेटा
Pandharpurlive 12 julay 2017
मुंबई : टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओनं ब्रॉडबँड इंटरनेट क्षेत्रात पाऊल टाकण्याची तयारी चालवली आहे. जिओनं चुकीनंच आपल्या वेबसाईटवर आपलं आगामी प्रॉडक्ट जिओफायबरची माहिती दिली. मात्र व्हायरल झाल्यावर ही माहिती लगेच वेबसाईटवरुन हटवण्यात आली.
जिओनं आपल्या वेबसाईटवरील ब्रॉडबँड सेवेसंबंधीच्या पेजवर जिओफायबर या नव्या प्रॉडक्टची माहिती दिली होती. जिओफायबरचा प्रीव्ह्यू प्लॅनमध्ये दर महिन्याला 100 जीबी डेटा 100 Mbps स्पीडने देण्यात येईल. ही ऑफर पहिल्या तीन महिन्यांसाठी ग्राहकांना दिली जाईल. मात्र जिओफायबरच्या राउटर इंस्टॉलेशनसाठी 4500 रुपये ग्राहकांना द्यावे लागतील, जे ग्राहकांना नंतर परतही केले जातील.
100 जीबी डेटा संपल्यानंतर जिओफायबरचा स्पीड 1Mbps होईल. जिओफायबर सेवा लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. वेबसाईटवर लीक झालेल्या माहितीनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, सूरत, वडोदरा आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये ही सेवा दिली जाईल.
वेबसाईटवर जिओफायबरची एक इमेजही दिसली. जी व्हायरल होताच डिसेबल करण्यात आली. जिओ इंस्टॉलेशन चार्जेसमध्येच मोडेमचेही चार्जेस घेतले जातील अशी शक्यता आहे.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111









