👁 10 Views

वर्षांभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत …!

देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चार दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेतील ‘निर्भया’ मात्र वर्षभरनतंर ही  न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कधी मिळणार कोपर्डीतील श्रध्दाला न्याय ? असा सवाल आत्ता  उपस्थित होत आहे ,
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ईतिहासात तेरा जूलै हा काळाकुट दिवस आहे या दिवसाने मराठ्यांना मराठा समाजाला हादरवून टाकले होते आणि संवेदनशिल मनं हेलावून टाकली होती परंतू या ढिम्म सरकारमुळे कोपर्डीतील मराठा ताईला न्याय मिळाला नाही आज कोपर्डी प्रकरणाला एक वर्ष पुर्ण होत आहे तरी देखील आरोपीना फाशीची शिक्षा झालेली नाही ज्यावेळी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिली होती त्यावेळी मु्यमंञी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि आरोपीना सहा महीण्याच्या आत फाशीची शिक्षा दिली जाईल परंतू अद्याप ही कोपर्डीतील आरोपीना शिक्षा नाही झाली त्यामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे 
 व तसेच दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणेच कोपर्डीतील घटनाही अत्यंत निर्घृण होती. अल्पवयीन मुलीवर केवळ बलात्कार करून नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली होती.  आणि तिचे हात खांद्यापासून निखळलेले होते. ती विवस्त्रावस्थेत होती आणि देहावर अत्याचाराच्या खुणा होत्या.कोपर्डीतील निर्दयी घटनेने राज्यसह देशभरात एकच खळबळ उडाली होती या घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी या सह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यसह देशभरात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आणि मराठा समाजाने हे मुक मोर्चे अत्यंत शांतते काढले,मोर्चा किवा आदोंलन काय असते हे सार्या जगाला मराठा समाजाने दाखवून दिले परंतू आज ही वर्षाभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत आहे त्यामुळे कधी मिळणार कोपर्डीला न्याय असा सवाल उपस्थित होत आहे
कोपर्डीच्या निर्भयाला जाऊन एक वर्ष झाले . तिला न्याय मिळावा म्हणून राज्यभरात रेकॉर्डब्रेक गर्दीचे मराठा क्रांती मोर्चे झाले . तरीही न्यायाची  प्रतिक्षा संपलेली नाही ?
दररोज आपला शेतकरी बाप आत्महत्या करतोय , शेतमालाला योग्य हमीभाव नाहीच .गुणवत्ताधारक मराठा युवकांना महाविद्यालयीन प्रवेश ते नोकरी या प्रवासात अनेकदा आरक्षण नसल्याचा जबरदस्त फटका बसतो आहे .
मराठा समाजाचंच आणि मराठा तरूणांच भवितव्य अंधःकारमय होत चालल आहे याला जबाबदार जितके राजकिय पक्ष आहेत तितकेच मराठा नेते ही जबाबदार आहेत कोपर्डीच्या निर्भयाला जाऊन उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे . तरीही कोपर्डीची निर्भया न्यायाच्या प्रतिक्षेत आहे .कोपर्डीच्या निर्भयाला 6 महिन्यात न्याय मिळवून देऊ असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पोकळ  ठरले असल्याच दिसून येत आहे
निलेश चाळक बीड मो ,९७६७८४६१९


  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *