21 Jul.2017
मुंबईः सोनी वाहिनीवर नव्याने दाखल झालेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका वादात अडकली आहे. मालिकेच्या कथानकावरुन वादाची ठिणगी पडली आहे. या मालिकेवर टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांनीच खंत व्यक्त केली आहे. या मालिकेच्या प्रोमोपासूनच नेमकं कथानक कसं असणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीच्या भांगात कुंकू भरताना दिसला होता. मुख्य म्हणजे टेलिव्हिजन अभिनेता करण वाही यालासुद्धा मालिकेचे कथानक खटकले आहे. त्यामुळेच त्याने फेसबुकवर या कार्यक्रमाविषयी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.
काय म्हणाला करण वाही…
– करणने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, – “प्रिय निर्माता आणि चॅनल… मी समजू शकतो की आपण हाऊ आय मेट युवर मदर आणि फ्रेंड्स यांसारखे शोज बनवू शकत नाहीत.”
– “प्रामाणिकपणे सांगायचे, म्हणजे मी याची अपेक्षासुद्धा ठेवत नाही. पण आपण सर्वजण या इंडस्ट्रीत असताना कमीतकमी टीआरपीच्या कंटेंटच्या नावावर लोकांना अडाणी बनवू नका.”
– “मी हे सर्व यासाठी म्हणतोय, कारण आपण यापेक्षा अजून चांगले शोज बनवू शकतो.”
सुयशने दिले करणच्या पोस्टला उत्तर…
– करणने या कार्यक्रमाविषयी खंत व्यक्त केल्यानंतर या मालिकेतील अभिनेता सुयश रायने मालिकेविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. – सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेतीलच काही दृश्यांचे फोटो काढत त्यासोबत भलंमोठं कॅप्शनही लिहिलं आहे.
– करण वाहीला उद्देशून त्याने लिहिलंय, ‘करण वाहीने जे म्हटलंय त्याला कोणीही विरोध करु शकत नाही. ते सर्वस्वी त्याचं मत आहे. पण, आम्ही सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमासाठी फार मेहनत घेतली आहे. आम्ही फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करु इच्छितो. बालविवाह किंवा इतर कोणत्याच रुढीला प्रोत्साहन देण्याचा आमचा मनसुबा नाही’, असं त्याने स्पष्ट केलंय.
पुढे वाचा, करण-सुयशचे पोस्ट आणि वाचा, काय आहे पहरेदार पिया की शोचा कंटेंट….
अशी आहे तेजस्वीनीची भूमिका…
– अलीकडेच divyamarathi.com सोबत बोलताना तेजस्वीनीने सांगितले, “मी या मालिकेत दीया हे पात्र साकारत आहे. ती रतन सिंहची बेस्ट फ्रेंड असते.”
– “काही कारणास्तव तिला रतनसोबत लग्न करावे लागते. खरं तर दोघांनाही लग्नाचा अर्थ ठाऊक नसतो.”
– “दोघांमध्ये पती-पत्नीचे नव्हे तर बेस्ट फ्रेंडचे नाते असते.”
– “रतन खूप मोठ्या संपत्तीचा मालक अशतो. त्यामुळे त्याला घरातच नातेवाईकांमध्ये दडून असलेल्या शत्रूपासून धोका अशतो. अशात दीया रतनची ‘पहरेदार’ बनून त्याचे रक्षण करते.”
– “दुस-या शब्दांत सांगायचे, म्हणजे मी माझ्या ‘पियाची पहरेदार’ अर्थातच पुरुषांपेक्षा जास्त पॉवरफुल आहे.”
ही आहे मालिकेची तथा…
– रतन (अफान खान) आणि दिया (तेजस्वीनी पारेख वायंगणकर) यांची चौकटीबाहेरील जोडी या मालिकेच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
– 19 वर्षीय तरुणीचं तिच्याहून वयाने बऱ्याच लहान म्हणजे 10 वर्षांच्या मुलाशी लग्न होतं.
– हे लग्न आणि त्यांच्यात परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नात्यातील रहस्य हा या मालिकेचा विषय आहे.
– मात्र या मालिकेचं हे कथानक सध्या अनेकांनाच खटकतंय. किंबहुना एका तरूणीचं लहान मुलाशी लग्न लावण्यामागचं काय कारण? हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय.
शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रतन (10 वर्षांचा मुलगा) काळ्या रंगाच्या सूटमध्ये तर शोची लीड अॅक्ट्रेस ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय.
रतन (10 वर्षांचा मुलगा) दीयाचा पाठलाग करतो आणि तिच्या नकळत तिचे फोटोज क्लिक करतो. रतन तिचा केवळ पाठलागच करत नाही, तर तिचा दुपट्टा ओढून तिला लग्नाची मागणी घालतो.













