👁 7 Views

साहित्यिकांच्या वतीने कवी रवी सोनार यांचा सन्मान सोहळा…

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 27 Julay 2017

साहित्यिकांच्या वतीने कवी रवी सोनार यांचा सन्मान सोहळा…
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील ख्यतःकीर्त अष्टपैलू साहित्यिक रवी वसंत सोनार यांच्या साहित्याची इंग्लड येथील जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्या बद्दल पंढरपूर शहर व परिसरातील साहित्यिक व साहित्य प्रेमी याच्या वतीने रवी सोनार यांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम रविवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वा. हॉटेल इन पंढरपूर येथे शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, साहित्यिक प्रा. डॉ. चांगदेव कांबळे,  सो. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील व ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल याच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या वेळी रवी सोनमार यांना सन्मान पत्र शाल, श्रीफळ व पुणेरी पगडी देऊन त्यांचा सहपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गार्डी येथील कवी रावसाहेब साठे यांच्या “बावनकशी सोनं” या लावणी संग्रहाचा प्रकाशन सोहळा हि संपन्न होणार आहे. या वेळी निमंत्रित कवींची बहारदार काव्य मैफल हि होणार आहे. 
या कर्यक्रमासाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहन सन्मान समिती प्रमुख सचिन कुलकर्णी साहित्य वर्तुळ पंढरपूर, निषाद प्रकाशन पंढरपूर व परिमल सांस्कृतिक व्यासपीठ यांच्या वतीने केले आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  















Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *