पंढरपूर Live 30 July 2017पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील श्रीपुंडलिक मंदिर समितीच्या वतीने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नुतन सदस्य सचिन अधटराव व शकुंतला नडगिरे यांचा सत्कार करण्यात आला.
समस्त महादेव कोळी समाजाचे श्रीपुंडलिक व महादेव मंदिर समितीच्या वतीने रविवार दि.30/07/2017 रोजी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नुतन सदस्य सचिन अधटराव व शकुंतला नडगिरे यांचा सत्कार पुंडलिक मंदिरानजीक करण्यात आला. यावेळी या दोन्ही नुतन सदस्यांच्या हस्ते भक्त श्रीपुंडलिकाची पुजा करण्यात आली. सचिन अधटराव यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव यांचे हस्ते करण्यात आला. शकुंतला नडगिरे यांचा सत्कार सौ.राणीताई सितापराव यांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ट्रस्टचे अध्यक्ष मारुती संगीतराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, सतीश नेहतराव, अनिल अभंगराव, संतोष अधटराव, नंदू अभंगराव, उत्तम परचंडे, उमेश संगीतराव, दत्तात्रय कांबळे, सुरेश परचंडे तसेच माजी नगरसेवक अनिल ज्योतिराम अभंगराव, विक्रम शिरसट, हरिभाऊ नेहतराव, सौ.रेखा कुलकर्णी, अनिल मनोहर अभंगराव, सुधीरभाऊ अभंगराव, बाबासाहेब अभंगराव, पोपट सावतराव, रमेश नेहतराव, गणेश तारापूरकर, दिलीप संगीतराव आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











