पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
खुशखबर..! उजनीत 50 टक्के चलसाठा..!
पंढरपूर Live
1 August 2017
टेंभुर्णी-गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतली असली तरी दौंड येथून १६ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात येत आहे. त्यामुळे धरणातील पाण्यात हळूहळू वाढ होत आहे. सोमवारी (दि. ३१) रात्री १० वाजता उजनी धरणात ५० टक्के चलसाठा झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी ३१ हजार क्युसेकने पाणी उजनी धरणात येत होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. भामा आसखेडमधून हजार ३९६ क्युसेक, खडकवासला धरणातून ८५६, आंध्रातून ३२५, चासकमानमधून १४००, कळमोडी येथून २४०, घोडमधून ८४० असा १० हजार ५५७ क्युसेक विसर्ग उजनी धरणाकडे येत आहे.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




