👁 6 Views

महापालिका म्हणतेय, चार दिवसांआड पाणीपुरवठा..! प्रत्यक्षात पाच दिवसांआड पाणी मिळणार सोलापूरकरांना..!!!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

महापालिका म्हणतेय, चार दिवसांआड पाणीपुरवठा..! प्रत्यक्षात पाच दिवसांआड पाणी मिळणार सोलापूरकरांना..!!!!


पंढरपूर Live 1 August 2017

सोलापूर- शहराच्या पाणी पुरवठ्यावर हळूहळू गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी राजकारणात गुंतले पण पाण्यासाठी पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिका अधिकारी यापूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता, आता चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात एक दिवस पुढे चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे, असे नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली.

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात पाणी संपले आहे. टाकळी येथील जॅकवेलला दोन फूट पाणी असून, ते चार आॅगस्ट पर्यंत पुरेल, अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली. औज बंधाऱ्यात पाणी येईपर्यंत शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने सांगण्यात आली. शहरासाठी उजनीतून एक आॅगस्ट पासून पाणी सोडण्याचा आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याची माहिती सभागृह नेता सुरेश पाटील यांनी दिली.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

शहरावर कृत्रिम पाणीटंचाई येण्याची शक्यता आहे. औज बंधाऱ्यातून रोज ७० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनीस सात ठिकाणी गळती असल्याने रविवारी दुरुस्ती करण्यात आली. पुन्हा दोन ठिकाणी पाइपलाइन फुटली. जीर्ण झाल्याने वारंवार फुटते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता दुलंगे यांनी दिली.

राजकारणात गुंतले

विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या कार्यालयासमाेर आंदोलन केल्याने महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे महापौर शोभा बनशेट्टी आणि सभागृह नेते सुरेश पाटील हे एकमेकांवर आरोप करण्यात गुंतले. पाण्यासाठी सामूहिक प्रयत्न नाहीत. नागरिकांना यांच्या राजकारणापेक्षा पाण्याची चिंता आहे, हे पदाधिकारी विसरल्याचे चित्र आहे.

प्रत्यक्षात पाच दिवसांआड होईल

शहरात ३० जुलै ते तीन आॅगस्ट पर्यंत चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होईल. यापूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगितले. पण विडी घरकुल, गांधी नगर, हत्तुरेवस्ती, कर्णिक नगर, एकता नगर, बाळे परिसरातील (काही भाग) नागरिकांशी थेट संपर्क साधला असता ते म्हणाले, चार दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. कागदोपत्री वेगळे तर प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती असल्याचे समाेर येत आहे.

‘औज’चे पाणी संपले, जॅकवेलला दोन फूट पाणी

औज बंधारा येथे पाणी संपले असून, चिंचपूर बंधाऱ्यातील बॅकवाॅटर पाणी टाकळी जॅकवेलला दोन फूट इतके आहे. पाऊस नाही. आल्यास ते पाणी चार आॅगस्टपर्यंत पुरेल.

सोलापूर शहरासाठी उजनीतून आजपासून पाणी सोडण्याचा आदेश

शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याबाबत महापालिकेच्या वतीने शासनास कळवण्यात आले. महापालिका सभागृह नेता सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी हे मुंबईत आहेत. पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उजनीतून मंगळवारपासून पाणी सोडण्याचे आदेश साेमवारी सायंकाळी दिल्याची माहिती सभागृह नेते पाटील यांनी दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, स्थायी समिती सभाती संजय कोळी यांनी महाजन यांची भेट घेतली असता त्यांनी पाणी सोडण्याचा आदेश दिला. एक आॅगस्ट रोजी निर्णय झाला तरी चार आॅगस्ट पर्यंत औज बंधाऱ्यात पाणी पोहचणे अशक्य आहे. त्यामुळे एक आठवडा शहरात पाणी टंचाई निर्माण होईल.

नागरिक म्हणतात, ….

कर्णिक नगर,एकतानगर भागात यापूर्वी चार दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. आज पाचवा दिवस झाला पाणी आले नाही. अवेळी पाणी येते.

– मारुती बंडगर, अध्यक्ष कर्णिकनगर, एकता नगर, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था

मागील कित्येक दिवसांपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. कमी वेळ कमी दाबाने पाणीपुरवठा हाेतो. तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात नाही.

– लक्ष्मण आकेन, नागरिक, विडी घरकुल, हैदराबाद रस्ता

आमच्याकडे झोपडपट्टी भाग आहे. चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. तीन दिवसांआड पाणी येत नाही.

– बालाजीकोटा, नागरिक, गांधीनगर, अक्कलकोट रस्ता

बाळे परिसरात व्यवस्थित पाणी पुरवठा होतो, काही दिवस जास्त दाबाने तर कधी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बाळे परिसरात चार दिवसांआड पाणी पुरवठा होतो, साधारणपणे सकाळी सहा ते आठपर्यंत पाणी पुरवठा होतो.

– सोमनाथ सराटे, नागरिक, बाळे परिसर


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *