पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 1 August 2017
पंढरीतील चैताली फाळके मृत्युप्रकरण…
पती-सासु-सासरे-दीर-नंणंद यांचेवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल..!
चैतालीची आत्महत्या नसून खूनच असल्याचा वकीलांचा युक्तीवाद..!
सासु-सासरा नणंद अद्याप फरार!!
पंढरपूरमधील तिरंगा नगर येथील चैताली अभिजित फाळके हिच्या मृत्युप्रकरणी तिची सासु शोभा फाळके हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्या.अभिनंदन पाटांगणकर यांच्या न्यायालयात सरकारी वकिलांचा व मुळ फिर्यादीच्या वकीलांचा युक्तीवाद पुर्ण झाला असून या खटल्यात आरोपीविरुध्द हुंडाबळी या कलमाची नव्याने वाढ झाली आहे.
मयत चैतालीचे वडील हेमंत गजेंद्र गडेकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सासरा वसंत नरहरी फाळके, सासू शोभा वसंत फाळके, नवरा अभिजीत वसंत फाळके, दीर विश्वजित वसंत फाळके, नणंद ऐश्वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके (सर्व रा.तिरंगा नगर, पंढरपूर) या पाच जणांविरुध्द गुन्हा नोंदला आहे. पैकी सासू, सासरा आणि नंणंद हे तिघे अद्याप फरार आहेत. सरकारी वकिलांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचा युक्तीवाद न्यायालयासमोर केला. त्यावरुन हुंडाबळीचं कलम वाढविण्यात आले. आहे. मयताच्या कुटूंबियांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु व पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांचेकडे केली आहे. त्या अनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणाच्या बर्याचशा बाबी संशयास्पद आहेत. घटनेदिवशी आरोपी सासु शोभा फाळके ही घटनास्थळीच हजर होती. यामुळे तिला या प्रकरणातील सर्वच बाबी माहित असणे स्वभाविक आहे. त्यामुळे तिला अटक करुन तपास करणे गरजेचे आहे.
मूळ फिर्यादितर्फे युक्तिवाद करताना अॅड. शशी कुलकर्णी व अॅड. ओंकार बुरकुल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ‘‘चैतालीची आत्महत्या नसून शांत डोक्याने तिलची पुर्वनियोजित हत्या झालेली आहे. राजकीय दबावापोटी ही हत्या अतिशय हुशारीने आत्महत्या आहे असा बनाव केलेला आहे.’’ यावेळी मुळ फियार्र्दीचे वकिलांनी कांही महत्वाची कागदपत्रे सादर करुन आरोपीच्या अटकपूर्व जामीनास तीव्र विरोध केला.सरकारतर्फे वकील सारंग वांगीकर मुळ फिर्यादीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. ओंकार बुरकुल यांनी तर आरोपीतर्फे अॅड. मिलींद थोबडे, अॅड.प्रशांत उंडाळे यांनी काम पाहिले. आरोपी शोभा फाळके च्या अटकपूर्व जामीन अर्जाचा निकाल उद्या दि. 2 ऑगस्ट 2017 रोजी लागणार आहे.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



