👁 7 Views

यात्रेतील लाऊडस्पीकरला बंदी घालायची असेल, तर सर्वधर्मांसाठी ते लागू करावं-योगी

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

यात्रेतील लाऊडस्पीकरला बंदी घालायची असेल, तर सर्वधर्मांसाठी ते लागू करावं-योगी

पंढरपूर Live 17  August 2017 

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकरबाबत वक्तव्य केलं आहे.
जर मी ईदला रस्त्यावरील नमाज बंद करु शकत नाही, तर मला पोलीस स्टेशनमधील जन्माष्टमी रोखण्याचा अधिकार नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. कावड यात्रेतील लाऊडस्पीकरला बंदी घालायची असेल, तर सर्वधर्मांसाठी ते लागू करावं लागेल, असंही योगींनी ठणकावून सांगितलं.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘केशव संवाद पत्रिका’ या विशेषांकाचा लोकार्पण सोहळा योगींच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी योगींनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
“जर रस्त्यावरील ईदची नमाज रोखू शकत नाही, तर पोलीस स्थानकातील श्रीकृष्ण जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार नाही”, असं योगींनी नमूद केलं.

योगी म्हणाले, “कावड यात्रेदरम्यान माईक किंवा लाऊडस्पीकर वाजवू नये, असं मला सांगण्यात आल्याने मी आश्चर्यचकीत झालो. त्यावेळी मी म्हणालो, ही कावड यात्रा आहे की शव यात्रा आहे? जर कावड यात्रेत ढोल, नगारे, डमरु वाजणार नाहीत, लोक नाचणार-गाणार नाहीत, तर ती कावड यात्रा कशी? यूपीत कावड यात्रेदरम्यान लाऊडस्पीकर वाजवण्यास कोणतीही बंदी नसेल. मी आदेश देतो की कावड यात्रेदरम्यान हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करा”


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *