👁 9 Views

मलकापूर नगरपरिषदेची पाणी पुरवठा योजना लवकर मार्गी लावणार – पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 22 August 2017 

    मुंबईदि. 22 : मलकापूर शहरातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेचा शासनस्तरावर पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगितले.
    मलकापूर (जि.कोल्हापूर) नगर परिषद अंतर्गत पाणीपुरवठा आणि विविध विकासकामांच्या मंजुरीबाबत आज नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मलकापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल केसरकर यांच्यासह मुख्याधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
    यावेळी राज्यमंत्री श्री. खोत यांनी सांगितले,मलकापूर नगरपरिषदेच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी २०५कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे असून, याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील आणि प्रधान सचिव यांची  बैठक आयोजित करण्यात येऊन त्यात निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
    मलकापूर शहरातील विविध विकासकामांसाठी आलेल्या निधीपैकी अखर्चीत निधी पुन्हा खर्च करण्याची परवानगी मिळावीअशी मागणी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने केली. त्यावर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले. तसेच विविध विकासकामे करण्यासाठी विकास आराखडा तयार करून वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिले.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *