👁 12 Views

तीन तलाक असंवैधानीक ठरविणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय क्रांतिकारक – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 23 August 2017 


    तीन तलाक असंवैधानीक ठरविणारा   सर्वोच्च  न्यायालयाचा  निर्णय क्रांतिकारक  – केंद्रियराज्यमंत्री  रामदास आठवले

    मुंबई दि 22 – तीन वेळा तलाक बोलून घटस्फोटाला मान्यता देणारी तीन तलाक ची पद्धत ही मुस्लिम महिलांवर अन्याय करणारी  असंवैधानीक असल्याचा आज  सर्वोच्च  न्यायालयाने दिलेला निर्णय  क्रांतीकारक असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  ना. रामदास आठवले यांनी दिली  आहे .  तीन तलाक असंवैधानीक ठरवून ती प्रथा बंद करण्याच्या निर्णयाने मुस्लिम महिलांवरील परंपरागत होणारा अन्याय दूर  होईल असे सांगत मुस्लिम महिलांना न्याय देणाऱ्या या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने आपण स्वागत करीत असून सर्वोच्च न्यायालयाचेही या निर्णयाबद्दल आपण अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांनी केले आहे .

    जगभरातील इतर इस्लामीक राष्ट्रांत तीन तलाक ची पद्धत कायद्याने बंद करण्यात आली आहे . मग अशी महिलांवर अन्याय करणारी तीन तलाक ची पद्धत भारतातच का ?  भारतात आता ही  तीन तलाक ची पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने  बंद करण्यात आली आहे . यापुढे कोणी तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट घेण्याचा प्रयत्न करेल ते कृत्य बेकायदेशीर ठरणार आहे . त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्वांना समान  न्याय समतेचे तत्व मांडले . महिलांना समान अधिकार दिले . संविधानाने दिलेले हक्क मुस्लिम महिलांना ही प्राप्त झाले आहेत . तीन तलाक मुळे अनेक वर्षे हजारो महिलांवर अन्याय झाला आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या तीन तलाक बंदी च्या निर्णयाने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे . या ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णयाचे  आपण स्वागत करीत असल्याचे मत केंद्रिय  सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे .

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *