👁 7 Views

पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांनी जुगारी पोलिस अधिकार्‍यावर केला गुन्हा दाखल..!

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

    • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 31 August 2017



    पंढरपूर तालुक्यातील एका गावात जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेले पंढरपूरचे उप विभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांना आपला पोलिस अधिकारीच जुगार खेळत बसलेला रंगेहाथ आढळून आला. श्री.पिंगळे यांनी यावेळी इतर जुगार्‍यांवर तर कारवाई केलीच; परंतु आपल्या खात्याची प्रतिमा डागाळणार्‍या सबंधीत जुगारी पोलिस अधिकार्‍याच्या या कृत्याची गंभीर दखल घेत त्यांनी त्याच्यावरसुध्दा तातडीने गुन्हा दाखल केला.

    याबाबतची सविस्तर माहिती अशी की,  पंढरपूर तालुक्यातील उंबरे(पागे) येथील हॉटेल सह्याद्री मध्ये जुगार व मटका चालू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पिंगळे यांना मिळाल्यानंतर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी 5.50 वाजण्याच्या सुमारास हॉटेल सह्याद्रीमध्ये छापा टाकला . त्याठिकाणी काही जण जुगार खेळताना आढळले. या जुगार्‍यांमध्येच करकंब पोलिस स्टेशनचे ए. एस. आय. भोसले ही आढळून आले. त्यांच्या टेबलवर तीन पानी पत्त्याची पाने व रोख रक्कम पडलेली होती त्यामुळे राजेश पितांबर ढोबळे, सुनिल हनुमंत कदम, तानाजी शंकर चौगुले, महादेव भगवान ढोबळे, ज्ञानदेव नामदेव कानगुडे, दिलीप रावसाहेब घोडके सर्व रा उंबरे(पागे) ता. पंढरपुर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु यावेळी करकंब पोलिस स्टेशनचे ए. एस. आय. रमेश भोसले यांनी मोटारसायकलवरुन पळ काढला. मात्र त्यांच्यावरसुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यावेळी मन्ना नावाचा जुगार व मटका खेळण्याकरिता वापरलेले साहित्य यामध्ये मोबाईल,टेबल वरील रोख रक्कम,जुगार खेळण्यास येण्याकरिता वापरलेली वाहने असा एकूण 90020 रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
    • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
    • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *