👁 9 Views

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतले भाविकांच्या सुविधेसाठी महत्वाचे निर्णय..! मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली माहिती

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september  2017 


पंढरपूर :- श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी कांही महत्वाचे निर्णय श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतले असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विठोबाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत लाखो भाविक तासन्तास ऊन्हापावसाची तमा न बाळगता श्रध्दापुर्वक तिष्ठत उभे असतात. परंतु लवकरच भाविकांचा हा त्रास संपवण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती श्री.भोसले यांनी दिली. येत्या कार्तिकी एकादशी पासून प्रायोगिक तत्वावर टोकन पध्दतीने भाविकांना दर्शन मिळणार आहे.

यासाठी शासकीय मान्यता प्राप्त कंपनी कडून पंढरपुरात विविध ठिकाणी टोकन केंद्र उभारणी होणार असून भाविक आल्यानंतर ‘थंब इमप्रेशन’ द्वारे ही सर्व प्रक्रिया होणार आहे. भाविकाला दर्शनाची वेळ समजल्यानंतर तोपर्यंत पंढरपुरात तो पर्यटन आणि बाजारात खरेदी करेल यामुळे इथला अर्थव्यवस्था सुध्दा सक्षम होईल.

पंढरपूरच्या चंद्रभागेचा घाट, मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग याठिकाणची स्वच्छता करण्यासाठी सुध्दा आता मंदिर समिती सक्रीय सहभागी राहणार आहे. लवकरच ‘स्वच्छ पंढरपूर’ साठी निविदा प्रक्रिया राबवणार असून या कामासाठी नामांकित कंपनीची निवड करण्यात येणार आहे. तसेच पंढरपूरचे सामान्य रुग्णालय मंदिर समितीने चालवण्याचा निर्णय घेतला आहे . तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे . अशी माहिती डॉ.भोसले यांनी दिली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *