- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 8 september 2017
पंढरपुर : संत बहिणाबाई चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट, जत जि. सांगली यांनी अभिनेते महादेव जाधवर यांच्या वेगवेगळया सामाजिक कार्यक्रम, लघुनाटय, चित्रपट, तसेच चालता बोलता, वाढवू गुणवत्ता या महिला व मुलांसाठी गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी संत बहिणाबाई उत्कृष्ठ अभिनेता निवेदक या पुरस्काराने गौरव केला.
तसेच डोन्ट युज कॅरिबॅग, दडपन, वूई आर इंडियन, असे लघुपट तसेच जातीयवाद या विषयावरील खरी गरज अशा लघुपटा मधून देशाचे विकासात भर पडेल असे विषय निवडून अनेक लघुपट तयार केले आहेत.तसेच शौचालय या गंभीर विषयवारही कलाटनी हा लघुपट तयार होत आहे. त्यामुळे गावाची स्वच्छता होण्यास व स्वच्छ भारत अभियानास मदत होणार आहे. तसेच मराठी सामाजिक चित्रपट आमच्या गावात, बाराच्या भावात केला, तसेच त्यांनी दिग्दर्शन, छायांकन, संकलन केलेला छोटी पाटलीन नं. १ या” लहान मुले सुद्धा देशाच्या विकासात भर घालू शकतात” यावर आधारित मराठी चित्रपटा मधे बालकलाकार प्रणितीचा मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे, पालकमंत्री मा. विजयकुमार देशमुख आदि मान्यवरांनी विशेष सन्मान करून कौतूक केले. या चित्रपटामध्ये त्यांनी स्वतः गितकार असलेले व स्वतः गायलेले गाणे “दिंडी निघाली पंढरीला” हे ही उत्कृष्ठ आहे.
महादेव जाधवर यांचे वडील कै.हिराजी जाधवर माजी सैनिक होते, त्यांचा डावा पाय युद्धात मांडीतून तुटला होता. परंतु त्यांचा होसला मजबूत होता. त्यांनी दिलेला सन्देश म्हणजे “महिला शक्ति हीच खरी राष्ट्र शक्ति त्यांचा विकास तरच मुलांचा विकास,आणि मुले म्हणजे देशाचे भवितव्य” असा होता. त्यामुळे महादेव जाधवर यांनी महिला व मुलांसाठी चालता बोलता, वाढवू गुणवत्ता हा कार्यक्रम सुरू केला, हा कार्यक्रम सुरवात सोलापुर जिल्हयातुन करून आता सम्पूर्ण महाराष्ट्र मधील मुंबई, पुणे,लातुर तसेच इतर जिल्हयामधे चालु आहे. त्यामुळे महिला व मुलींना व्यासपीठ मिळेल त्यांच्यातील न्युनगंड दुर होउन गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर परदेशात असणारे भारतीय लोकांसाठीही हा कार्यक्रम दुबई, सिंगापुर, मलेशिया या देशामधेहि होणार आहे.
अशी वाटचाल पाहून संत बहिणाबाई चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट जत चे संस्थापक राजु सावंत व पदाधिकारी यांनी महादेव जाधवर यांचा संत बहिणाबाई चौधरी उत्कृष्ठ निवेदक अभिनेता म्हणून निवड करून गौरव केला. त्यप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.कमल पवार, संस्थापक राजु सावंत, कार्यध्यक्ष सौ.सुषमा मदने, बालासाहेब जाधव, भगवानदास केंगार, लक्ष्मण साळुंखे, दिनकर पतंगे,अजित गिरीबुवा, दिलीप कसबे, राज साकरे, गोविंद कुलकर्णि, कपिलदेव पारसे, दादासो गायकवाड, एस. एन. गडिकर, सुभाष कुलकर्णि, वैभव जाधव, श्रीकांत दुर्गे, सूरज कांबळे, संतोष सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


