- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरीत भव्य ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचे १४ वे वंशज वैकुंठवासी हरी भक्त परायण श्रीगुरु पंढरीनाथ महाराज नामदास यांच्या पुण्यस्मरण शताब्दी वर्षानिमित्त तसेच श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचे१५ वे वंशज वैकुंठवासी हरी भक्त परायण श्रीगुरु मृदूंगमनी तुकाराम महाराज पंढरीनाथ महाराज नामदास यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री माधव महाराज नामदास,मुकुंद महाराज नामदास ,निवृत्ती महाराज नामदास व श्री मुरारी महाराज नामदास यांनी कळविले आहे .
सदर कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे पहाटे ४ ते ६ काकडा आरती व भजन ,सकाळी ६.३० ते ९.३० ज्ञानेश्वरी पारायणं,सकाळी १०.३० ते १२.३० कीर्तन ,दुपारी ३.३० ते ४ चातुर्मास नियमाचे प्रवचन ,दुपारी ४ ते ५ मान्यवरांचे प्रवचन ,दुपारी ५ ते ६ हरिपाठ व सायंकाळी ७ ते ९ कीर्तन असे स्वरूप आहे या सोहळ्यास कीर्तनाची सेवा देणाऱ्या हरी भक्त पारायण सर्वश्री शंकर महाराज बडवे,एकनाथ महाराज हांडे,राम महाराज राऊत ,गुरुराज महाराज देगलूरकर ,धोंडोपंत महाराज शिरवळकर ,श्रीपाद महाराज भडंगे ,बाळशास्त्री महाराज हरिदास,प्रभाकर महाराज झोलकर ,कृषिकेष महाराज वाघचवरे ,चैतन्य महाराज देगलूरकर ,राणा महाराज वासकर ,बाबा महाराज सातारकर ,अजय महाराज टिळक ,रामराव महाराज ढोक ,,गहिनीनाथ महाराज औसेकर,पुंडलिक महाराज देहूकर ,बंडातात्या कराडकर,मारुती महाराज कुर्हेकर ,ज्ञानेश्वर महाराज नामदास ,चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाचा लाभ मिळणार आहे.
या उत्सवाचा सांगता समारंभ ग्रंथपूजनाने होणार असून सोमवारी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे ,या कार्यक्रमासाठी खालील सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत सर्वश्री हरी भक्त परायण गुरुजीबुवा राशिंकर महाराज फड , आमदार भारतनाना भालके,रामदास महाराज जाधव (कैकाडी महाराज ) ,नगराध्यक्ष सौ ,साधनाताई भोसले,ज्ञानेश्वर महाराज चतुर्मासे, ज्ञानेश्वर महाराज शिरवळकर ,निखिलजी पिंगळे साहेब,नारायण महाराज अलिबागकार ,महेश महाराज कवठेकर,लीलाताई मालेगाव ,विठ्ठल पाटील सांगली,तुपे आबा ,बाप्पा तांबिले सदर कार्यक्रम सोमवार दिनांक ११/९/२०१७ ते १८/९/२०१७ या कालावधीमध्ये श्रीसंत नामदेव महाराज जन्मस्थान मंदिर ,श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आयोजित केला असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घयावा असे संस्थान तर्फे कळविण्यात आले आहे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


