👁 9 Views

भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील 6 जणांचा जागीच मृत्यू

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 8 september  2017 


सोलापूर-कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बेळगी तालुक्यात कर्नाटक राज्य परिवहनची बस आणि एका क्रूझर व्हॅनची धडक होऊन सकाळी झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील दारफळ सिना व उपळाई खुर्द येथील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातग्रस्त व्हॅन कारवारहून सोलापूरकडे येत होती. तर, बस विजयपुरा येथून बागलकोटकडे निघाली होती. विजापूर-हुबळी रोडवर कोर्सी गावाजवळ या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की बसच्या धडकेत व्हॅनच्या अर्ध्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. व्हॅनमध्ये 12 प्रवासी होते. त्यातील 6 जागीच ठार झाले. तर, दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बसमधील काही प्रवासी जखमी
बसमधील काही प्रवासीही अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नागेश, विजया शिंदे व पांडुरंग साळुंखे यांचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. व्हॅनमधील प्रवासी कॅन्सरवरील उपचारासाठी कारवारला गेले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *