👁 10 Views

मंदिर समिती उभारणार सुसज्ज व भव्य अन्नछत्र..! समिती अध्यक्ष डॉ.भोसले यांची माहिती

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 8 september  2017 
सध्याचे एमटीडीसीचे पर्यटन निवास (भक्तनिवास) सहा एकर जागेसह भाडेपट्टा वाढवून घेऊन त्या ठिकाणी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सुसज्ज अन्नछत्र उभारणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. भोसले यांनी दिली आहे. तसेच येथे संतपीठाचे मुख्यालय उभारणार असल्याचेही ते म्हणाले.

विठ्ठल मंदिरात लवकरच आणखीन पुजारी नियुक्त केले जातील. एफडीएच्या नियमांना अधीन राहून लवकरच लाडू प्रसाद बनवण्याच्या कामाचे आऊटसोर्सिंग केले जाईल.  संत विद्यापीठाची निर्मिती लवकरात लवकर व्हावी यासाठी पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार. ही समिती अभ्यास करून (विद्यापीठाच्या दर्जासह) तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करणार. भक्तनिवासाच्या कामांची पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांकडून पाहणी करणार. या पाहणीत जर भक्तनिवासाचे निकृष्ट काम झाल्याचे निदर्शनास आले तर त्या कामाची देयके (बिले) काढली जाणार नाहीत, असेही डॉ. भोसले म्हणाले.

पंढरपुरातील नागरिकांना तसेच बाहेरगावाहून येणार्‍या भाविकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि पालिकेचे रुग्णालय मंदिर समितीला चालवण्यासाठी देण्याचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर केला जाणार आहे. शासनाने मंदिर समितीच्या या प्रस्तावास मंजुरी दिल्यास या दोन्ही रुग्णालयांतून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून या रुग्णालयामध्ये नामवंत डॉक्टरांच्या सुविधा मंदिर समिती उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना कित्येक तास दर्शन रांगेमध्ये थांबावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शनाची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी भाविकांना दर्शनाचे टोकन वितरणाची सोय केली जाईल. या सुविधेसाठी येणारा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे या सुविधेसाठी भाविकांना आणि मंदिर समितीला एक रुपयादेखील खर्च करावा लागणार नाही.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *