👁 9 Views

स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र वार्षिकी’ उपयुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे प्रतिपादन

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 8 september  2017 


सोलापूर, दि.8 :-महाराष्ट्र वार्षीकी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे व्यक्त केले.
            राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने महाराष्ट्राची अधिकृत माहिती देणाऱ्या महाराष्ट्र वार्षिकी 2017 या संदर्भ पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाचे आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते स्थानिक स्तरावर प्रकाशन करण्यात आले.त्यावेळी श्री. भोसले बोलत होते या कार्यक्रमावेळी जिल्हा माहिती अधिकारी  रविंद्र राऊत उपस्थित होते.
या संदर्भ पुस्तकामुळे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांना अचूक संदर्भ उपलब्ध झाले आहेत. राज्यातील विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी हे पुस्तक महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला.
         माहिती वा जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या संदर्भ पुस्तकात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, परंपरा, जिल्हे, शासनाचे विभाग, महत्वाच्या घडामोडी, सर्व जिल्ह्यांची सर्वंकष माहिती  याचा समावेश आहे. हे पुस्तक प्रामुख्याने स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार, संशोधक, शिक्षक आदींसाठी उपयुक्त आहे.सदरच्या पुस्तकाची किंमत 300 रूपये आहे.
पुस्तक जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती इमारत, होम मैदानासमोर, सोलापूर (दूरध्वनी 0217-2731040) येथे तसेच उपमाहिती कार्यालय, तालुका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, पंढरपूर ( दूरध्वनी 02186-223406) येथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर हे पुस्तक शिवगंगा बुक स्टॉल, दत्त चौक, सोलापूर(दूरध्वनी – 2628343), शिवगंगा बुक डेपो, लष्कर, सात रस्ता, सोलापूर (दूरध्वनी -2313456), अपर्णा एजन्सी, दत्त चौक, सोलापूर (दूरध्वनी – 2627822,2679822), विक्रम बुक स्टॉल, स्टेशन रोड, पंढरपूर (9960701765) यांचेकडेही विक्रीस उपलब्ध आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *