👁 7 Views

जम्मु काश्मीर राज्यातील तिघांनी घेतला स्वेरी अभियांत्रिकीत प्रवेश एन.बी.ए मानांकनामुळे पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेचा मिळाला लाभ

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 9 september  2017 
पंढरपूर- एन.बी.ए (नॅशनल बोर्ड ऑफ आक्रिडीडीटेशन) अर्थात राष्ट्रीय मानांकनाचे महत्व नेमके काय असते याची प्रचिती आता महाराष्ट्रातील इंजिनीअरिंग इन्स्टिटयूटला येत आहे. जम्मू काश्मीर राज्यातील तीन विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेचा तसेच राज्याबाहेरील विचार करता मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला स्वेरीमध्ये शिक्षण घेण्याची संधी नुकतीच मिळाली आहे.
              जम्मू काश्मीर राज्यातील तुर्तुक फरोल(ता. नुबराजि.- लेह)मधील झुल्फीकार अली बखीकर (ता. हंडवाराजि.-कुपवारा) मधील आफाक अहमद यांनी पदवी अभियांत्रिकीच्या सिव्हील इंजिनीअरिंग तर कोडगा (ता. कोरगासालजि.-जम्मू) मधील पुनीत साहनी यांनी कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग विभागात पहिल्या वर्षी प्रवेश घेतला असून त्या तिघांनी पंतप्रधानांच्या विशेष अधिकारात असलेल्या प्रवेश कोट्यातून त्यांनी हा प्रवेश मिळविला. पंतप्रधानाच्या अक्त्यारीत असलेल्या केवळ एन.बी.ए. मानांकन प्राप्त असलेल्या महाविद्यालयातच अशा विशेषाधिकारात प्रवेश घेता येतो. सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येतवार्षिक परीक्षेच्या निकालात व प्लेसमेंट मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संखेत देखील आघाडी मिळवून सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर राहण्याचा मान स्वेरीला मिळाला. आणि त्यातून यंदाच्या वर्षी अभियांत्रिकीच्या सर्व विभागांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए मानांकन प्राप्त झाल्यामुळे.या महाविद्यालयाचे महत्व वाढल्याचे दिसून येते. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उच्च शिक्षित प्राद्यापकांच्या गुणवत्तापूर्ण अभ्यास घेण्याच्या धोरणामुळे तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांमुळे या ठिकाणी त्या तिघांनीही प्रवेश घेतला आहे. याबाबत बोलताना झुल्फीकार अली म्हणाले की, ‘पंतप्रधान कोट्यातून मला प्रवेश मिळाला असून इंटरनेटच्या माध्यमातून स्वेरीची माहिती मिळविली असता वार्षिक परीक्षेचा निकाल व प्लेसमेंट हे जीवनात महत्वाच्या गोष्टीला स्वेरीत प्राधान्य दिले जातेविद्यार्थ्यांना मिळणारी शिस्त यामुळे भविष्य उज्वल असल्यामुळे मी प्रवेश घेतला.’ आफाक अहमद म्हणाले की, ‘आम्ही अभियांत्रिकीची माहिती सर्च करत असताना स्वेरीची माहिती मिळाली त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी फोन करून स्वेरीविषयी माहिती मिळवली त्यामुळे स्वेरीशिवाय आम्ही इतर महाविद्यालयाचा विचारच केला नाही.’ व पुनीत साहनी म्हणाले की, ‘या महाविद्यालयाला एन.बी.ए. हा राष्ट्रीय दर्जा असणारे मानांकन मिळाले असून भविष्यात याचा फायदा होईल आणि स्वेरीमधील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण असून संशोधन करण्यावर विशेष भर दिले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही स्वेरीतच प्रवेश घेण्याचे पक्के केले.’ या तिघांच्या प्रवेशामुळे आंतरराष्ट्रीय मानांकन एन.बी.ए चे अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष महत्व असल्याचे लक्षात येते. पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेद्वारे प्रवेश हे राष्ट्रीय मानांकन मिळविणाऱ्या महाविद्यालयांना मिळविता येते. पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेतून प्रवेश घेतलेल्या तिघांच्या व इतर राज्यातील दोन विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बोलताना स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘या महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्यामुळे तिघांनी याठिकाणी पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेतून प्रवेश घेतला असून आवश्यक शैक्षणिक सर्वसोयी त्यांना मिळणार आहेत. यात कोठेही कमतरता भासू देणार नाही तसेच आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या येथे घेतलेल्या तंत्रशिक्षणाच्या अनुभवातून आलेल्या दोन विद्यार्थ्यांना देखील सर्व विद्यार्थ्यांप्रमानेच शिक्षणाची संधी मिळणार आहे.     
जम्मू काश्मीर बरोबरच मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशमधूनही झाले अॅडमिशन
            बुऱ्हानपूर (जि.-बुऱ्हानपूर मध्यप्रदेश) मधील गौरव गुरुजी व उत्तर प्रदेश मधील आहेरपूर (ता.भार्थनाजि.-इटावा) येथील रजत गुप्ता यांनी देखील इंटरनेटच्या माध्यमातून स्वेरीमधील संशोधनाचे वातावरण,आदरयुक्त शिस्तविद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष व स्वेरीला मिळालेल्या एन.बी.ए मानंकानामुळे तसेच यापूर्वी उत्तर प्रदेश मधील काही विद्यार्थी स्वेरीत शिक्षण घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीत लागल्यामुळे त्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवामुळे या दोघांनी देखील इतर ठिकाणी प्रवेश मिळत असतानाही स्वेरीतच प्रवेश घेतला.
छायाचित्र-  केंद्र सरकारच्या पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेतून प्रवेश घेतलेले विद्यार्थी झुल्फीकार अली,आफाक अहमदपुनीत साहनी व मध्यप्रदेशचे गौरव गुरुजीउत्तर प्रदेशचे रजत गुप्ता व सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे.
From-
Shri. Santosh  C. Halkude
Pandharpur – 413 304. 
Mob: 9545 55 36 28, 

          9850 24 21 55 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *