- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 11 september 2017
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- ईश्वराचे कर्ता, धरविता, उकरविता असणारे ब्रम्हणडामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा यांचे निश्चित भक्त असणारे पांडुरंगाचे लाडके भक्त असणारे भक्तीचा भक्तीच्या प्रेमाचा ज्यांनी कळस केलेला आहे. आपल्या भक्त्तीद्वारे, आणि भक्तीमध्ये काय शक्ती त्या भक्तीच्या शक्तीद्वारे ज्यांनी आपल्या हाताने दुध पाजले,
देवाला प्रत्यक्ष जेवू घातले.हातीच मृत्यू जीवी असावे असा ज्या संता सामर्थ्य असत ज्या संतामध्ये सामर्थ्य आहे तेच वारकरी सांप्रदायामध्ये संत झाले ज्यांनी भक्ती केली तेच संत झाले असे प्रतिपादन ह.भ.प.धर्मभुषण पुंडलिक महाराज खुरमुटे यांनी केले.
कै.कोंडिबा महादबा गित्ते यांच्या गंगापुजन कार्यक्रमा निमित्ताने मलकापूर ता.परळी वैजनाथ गावात आयोजित केलेल्या किर्तनाच्या माध्यमातुन भाविकांच्या समोर ते बोलत होते. किर्तन सेवेसाठी पुंडलिक खुरमुटे महाराजांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा धनवान बळे नाढविसी देवा मत्युकाळी तेंव्हा कोण आहे खख यमाचे यमदंड बैसतील माथा तेंव्हा तुज रक्षिता कोण आहे खख माय बाप बंधू सोयरे तोवरी इंद्रिय जोवरी वाहताती सर्वस्व स्वामींनी म्हणवीसी कांता तेही कोश देता रडतसे खख विष्णूदास नाम जाताची शरण स्वप्नी जन्ममरण नाही नाही या अभंगातून निरूपण केले.
महाराजांचे लिखीत श्री संत वचनामृत धारा भाग १, २, मामासाहेब दांडेकर, कृपा प्रासदिक श्री ज्ञानेश्वरी, आत्म जागृती नको आत्महत्या ह्या पुस्तके प्रकाशीत झाले आहेत.आगामी गो हत्या बंदी पुर्ण जगात व्हावी, श्री संत मामासाहेब दांडेकर चरित्र, सुर्यनमस्कार, प्राणायाम करा तुमचे शरीर, मत पुर्णपणे निरोगी निर्माण निर्वेर आनंदमय होईल. हे प्रकाशीत होणार आहेत. यावेळी ह.भ.प.धर्मभुषण पुंडलिक महाराजांचे स्वागत मधुकर गित्ते, फुलचंद गित्ते यांनी केले.
यावेळी कीर्तनास प्रा.डॉ. नागोराव पाळवदे, ज्येष्ठ नेते वसंत मुंडे,प्रा.नारायण पाळवदे, प्राचार्य बी.डी.मुंडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष मुंडे,अँड.श्रीनिवास मुंडे, अँड. दतात्रय महाराज आंधळे, कन्हेरवाडी सेवा सोसायटी चे सदस्य नाथ्राराव फड,लमाण तांडा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील गित्ते, ह.भ.प.वसुदेव महाराज मुंडे, रंगनाथ महाराज शास्त्री, रावसाहेब जगताप, पोलीस कॉं.राम बदने, हरिहर चाटे, युवा नेते रवी चाटे, दिनेश लोंढे, गोविंद मोहेकर, प्रशांत रामदासी, प्रमोद ओटी, बालाजी शहाणे, संतोष घुंमरे आदी तसेच गित्ते परिवारातील अनेकांची उपस्थिती होती.या किर्तनाला गावातील, पंचक्रोशीतुन भाविक भक्तांनी आणि किर्तनासह महाप्रसादाचाही लाभ सर्वांनी घेतला.अतिशय नियोजन करून गित्ते कुटुंबीयांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. तसेच गावकरी, महिला, पुरुष, मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


