- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 11 september 2017
पंढरपूर: दि. “ महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभ्यास, सेवा, श्रम यांचा
अंगिकार करून नावलौकिक मिळवावा. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून
अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी. त्यासाठी चिकाटी, जिद्द, परिश्रम
आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजसेवेचा संस्कार
स्वयंसेवकांनी स्वीकारावा. ” असे प्रतिपादन पंढरपूरचे तालुका कृषी अधिकारी
मा. श्री. एम. यु. कौलगे यांनी केले.
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत
होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व कळते. मी
देशासाठी काहीतरी करीन ही भावना विद्यार्थ्यामध्ये वाढीस लागली पाहिजे.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून विज्ञान, तंत्रज्ञानाचा उपयोग
समाजाच्या विधायक कार्यासाठी केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे
मा. प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘ लोकसंख्या
नियंत्रण, अंधश्रध्दा निर्मुलन व विविध सामाजिक समस्यांच्या बाबतीत राष्ट्रीय सेवा
योजना स्वयंसेवकांनी प्रबोधनाचे काम केले पाहिजे.त्यासाठी विवेकवादी होणे
आवश्यक असून त्या बरोबरच या विचाराला कृतीची जोड असणे आवश्यक आहे.
आपली प्रत्येक कृती ही विवेकशील असायला हवी. शिस्त हाच सर्व कार्याच्या
यशस्वीतेचा मुलमंत्र असल्याचे सांगून युवावर्ग हा प्रचंड उर्जेचा स्रोत असल्याचे
सांगितले. एन. एस. एस. स्वयंसेवक-स्वयंसेविकानी आपली विधायक शक्ती
ओळखून त्याचा उपयोग समाज घडविण्यासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठवर कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी , एन.
एस. एस. च्या सोलापूर विद्यापीठ विभागीय समन्वयक प्रा. डॉ एफ. एस.
विजापुरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन डॉ. राजाराम राठोड आदी मान्यवर
उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. प्राचार्य यांचे मार्गदर्शनाखाली .
प्रा.भगत, प्रा. सुळे, प्रा. शेख, प्रा. कु. घोडके, प्रा. शिवशरण, प्रा. शिंदे. श्री.
कारंजकर, श्री विकास कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. राठोड
यांनी तर सूत्रसंचालन प्रा.बी. जी. भगत यांनी केले. आभार डॉ एफ. एस. विजापुरे
यांनी मानले. याप्रसंगी एन. एस. एस. स्वयंसेवक-स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित
होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

