- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
स्वेरीत ‘अभियंता दिन’ संपन्न तर ‘ऑलंम्पस २०१७’ चे थाटात उदघाटन
पंढरपूर- ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय अभ्यासताना मनात एक प्रकारचे कुतूहल निर्माण होते त्यामुळे अनेक प्रश्नाच्या उत्तरांचा शोध घेताना नवीन साहित्य अथवा संशोधनांची निर्मिती होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अथवा नवीन गोष्टी करताना त्यात कुतूहल जागृत ठेवल्यास सर्वांगीण विकास होवू शकतो व प्रगती साधता येते.’ असे उदगार प्रख्यात साहित्यीक व आय.आय.टी मुंबई मधील केमिकल इंजिनीअर प्रा. अच्युत गोडबोले यांनी काढले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातआयोजित केलेल्या ‘अभियंता दिनी’ व ‘ऑलंम्पस २०१७’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धा कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून साहित्यीक प्रा.गोडबोले उपस्थित विद्यार्थी व पालकांना मागदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम्म विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी संस्थेची संपुर्ण माहिती व प्रास्ताविकता केली. ‘ऑलंम्पस २०१७’ चे सचिव गणेश सुरवसे यांनी स्पर्धेची संपूर्ण नियमावली व सविस्तर माहिती दिली. स्वेरीचे आश्रयदाते दामाजी कारखाना मंगळवेढयाचे चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की, ‘स्वेरीचे यश हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापात्र बनविण्यासाठी येथील प्राध्यापक वर्ग प्रचंड परिश्रम घेत असतात. त्यामुळेच या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी परिवक्व अभियंते बनत आहेत.’ पुढे बोलताना पाहुणे गोडबोले म्हणाले की, ‘आपण काय आहोत ? हे आपल्या कार्यातून दाखवून दयावे. विद्यार्थ्यांकडे विषय, ज्ञान आणि माणूसकी जर असेल तर भविष्यात त्याचा पुरस्कार जगभर होईल. विद्यार्थ्यांनी इंग्रजी संवाद साधताना संपूर्ण व्याकरणांचा वापर करावा.’ असे सांगून गोडबोले यांनी प्रकाश, सवांद, प्रवाह,मुसाफिर अशा अनेक पुस्तकांचे संदर्भ देवून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व साहित्य लेखनासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘आपण महापुरुषांचा गौरव याच्यासाठीच करतो की, आपल्याला व समाजाला त्यांच्या माध्यमातून एक प्रकारे प्रेरणा व ऊर्जा मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणारे कौशल्यज्ञान समाज्याच्या उपयोगी आणावेत. यावेळी सोलापूर विद्यापीठात विविध समित्यांवर निवड झाल्यामुळे प्राचार्य डॉ.रोंगे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. पी.एस.कचरे, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. एस.ए. लेंडवे,इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचे डॉ. मानसी पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त अशोक भोसले, विश्वस्त बी.डी.रोंगे, आश्रयदाते बाबुराव बेंदगुडे, गणपत तावडे, माजी विश्वस्त श्रीमंत गायकवाड, प्रा. लक्ष्मीप्रसाद मोहिते,पालक संघाचे दैठणकर, जेष्ठ पत्रकार अभय जोशी, धनंजय वाघमोडे, संकेत कुलकर्णी, सचिन झाडे, सचिन कांबळे, स्वेरी अतर्गत असणाऱ्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जी.कुलकर्णी, प्रा.सतिश मांडवे, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. एस.एन. कुलकर्णी, अधिष्ठातासचिन गवळी, सांस्कृतिक विभागप्रमुख करण पाटील,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, प्रा. यशपाल खेडकर,शिक्षकेतर कर्मचारी, मृणालिनी माने, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. यावेळी ‘ऑलंम्पस २०१७’ निमित्ताने सर्व विभाग आकर्शक पध्दतीने सजविले होते. सुत्रसंचालन रोहित कांबळे,रोहन कुरनकोट, मोहिनी परांडे यांनी केले. तर ‘ऑलंम्पस २०१७’ चे खजिनदार समर्थ उपळकर यांनी आभार मानले.
छायाचित्र- १.स्वेरीत ‘अभियंता दिना’ निमित्त मार्गदर्शन करताना प्रख्यात साहित्यीक व आय.आय.टी मुंबई मधील केमिकल इंजिनीअर प्रा. अच्युत गोडबोले, सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, चेअरमन समाधान आवताडे व इतर २. प्रमुख पाहुणे केमिकल इंजिनीअर प्रा. अच्युत गोडबोले यांचे स्वागत व सत्कार करताना विश्वस्त अशोक भोसले, सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, चेअरमन समाधान आवताडे व इतर मान्यवर.
From-
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

