👁 7 Views

खळबळजनक-पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयत्याने मारहाण

Pandharpur Live : पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आकडे टाकुन  होणारी वीज चोरी थांबणा-या वीज महावितरणच्या कर्मचा-याला कोयता, काठी व दगडाने मारहाण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

फिर्यादी नरसिंह बलभीम लांडे वय.45 वर्ष,धंदा :नोकरी ,हेल्पर वीज महावितरण कंपनी ,राहणार :संतपेठ, पंढरपूर ता. पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 
भा.दं.वि. कलम 353,332,504,506,189,34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 
याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार दि. 16/12/ 19 रोजी रात्री 8:00 वा. चे सुमारास मौजे चळे, ता. पंढरपूर (बरड वस्ती) येथे महावितरण कंपनीचा सदर कर्मचारी दिनांक 16/12/19 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मौजे चळे, ता. पंढरपूर गावचे शिवारातील चोरून टाकलेले आकडे काढण्याचे काम करीत असताना बरड वस्ती येथे शंकर भिमराव वाघमोडे यांचे घरासमोर LT लाईन जवळ चोरून टाकलेले विजेच्या आकडे काढत असताना दगडू हरी शिखरे व दादा हरी शिखरे यांनी “तुम्ही-आम्ही टाकलेले आकडे का काढले “असे म्हणून शिवीगाळ करून हातातील काठीने व दगडाने फिर्यादीच्या डोकीवर ,पाठीवर, छातीवर, मारहाण करून जखमी केले. तसेच साक्षीदार कल्याण कांबळे यांनाही गच्चीला धरून धक्के देऊन काठीने व दगडाने पाठीवर ,पिंडरीवर दंडावर गुडघ्यावर, डाव्या हाताच्या कोपरावर मारहाण करून जखमी केले व ते काम करत असताना शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ दमदाटी करून तू गावात काम कसे करतोस ते बघतो तुला गावात राहू देत नाही असे म्हणून निघून गेले.

आरोपी :1) दगडू हरी शिखरे 2) दादा हरी शिखरे ,राहणार :चळे, तालुका: पंढरपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 



_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *