👁 11 Views

धक्कादायक… डीआयजी वर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Pandharpur Live : 
17 वर्षीय अल्पवयीन मुलीची लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) निशिकांत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोस्कोअंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुरुवारी हा गुन्हा दाखल झाला आहे. 

खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एम.टी. विभागात डीआयजी पदावर कार्यरत असलेले 
मोरे हे मोठे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती.

पीडित मुलीचा 5 जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिच्या कुटुंबीयांनी घरामध्ये बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते.  या पार्टीला आमंत्रण नसताना निशिकांत मोरे उपस्थित राहिले. त्यांनी सर्वांसमोर पीडित मुलीची लैंगिक छळवणूक केली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. मात्र मोरे बडे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर विविध सामाजिक स्तरांतून दबाव वाढू लागल्यानंतर तळोजा पोलिसांनी आज रात्री मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले, विकासक असलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले होते. काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने आॅगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केक कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. 

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *