👁 13 Views

पंढरपूर- झटपट श्रीमंतीचा हव्यास नडला… पंढरपूरमधील डॉक्टरकडून 22 लाखांचा गंडा! अनेकांना फसवलं!!

Pandharpur Live : 
राहुल शेजाळ नावाच्या एका डॉक्टरने अनेकांना बिटॉक्सी कॉइन या योजनेत रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितलं. एका वर्षातच रक्कम दुप्पट होते म्हटल्यावर पंढरपुरातील अनेकांनी पन्नास हजार, लाख, दोन लाख जमेल तशी रक्कम जून  २०१८ मध्ये गुंतवली. हा डॉक्टर परिचयाचा असल्याने डोळे झाकून विश्वास ठेवला. लोकांना दामदुप्पट पैसे देतो म्हणून लाखो रुपयांचा गंडा घातल्याबाबतचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. संबधीत डॉक्टरचे नाव डॉ. राहुल ज्ञानदेव शेजाळ (रा. ऋणानुबंध निवास सप्तश्रृंगी नगर, ढवळस रोड, मंगळवेढा, सध्या मुक्काम पुजारी सिटी घर नं२०५ इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर) असे आहे. यासंदर्भात अधिक माहिती पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

डॉ.राहुल ज्ञानदेव शेजाळ यांनी बिटाँक्सीकाँईन कंपनीचा एजंट असल्याचे अनेक लोकांना भासवले. तसेच त्यांच्याकडून वर्षात दामदुप्पट पैसे देतो म्हणून 2018 मध्ये लाखो रुपये घेतले. यामध्ये पंढरपूर शहर, गुरसाळे, उपरी, गुरसाळे (ता. पंढरपूर), सोताली (ता. करमाळा), मंगळवेढा, डोंबवली (ठाणे) व औरंगाबाद येथील लोकांचा समावेश घेतले.

वरील गावातील सर्व लोकांची 22 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी डॉ. राहूल शेजाळ यांच्या विरुध्द मधुकर देशपांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात भादंविक 409, 420, 504 सह पुरस्कार चिठ्ठी आणि पैशांची खप योजना बंदी अधिनियम 9178 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा नोंद गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि. दशरथ वाघमोडे हे करीत आहेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *