👁 12 Views

माणुसकीला काळीमा- पंढरपूर तालुक्यातील तुंगत मध्ये मतीमंद मुलीवर लैंगीक अत्याचार… सविस्तर बातमी

Pandharpur Live : 
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एका मतीमंद मुलीवर लैंगीक अत्याचार घडल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

याबाबत तालुका पोलीस ठाणेकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार दि. 8 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता अर्जुन दिगंबर शितोळे, वय अंदाजे 35 (रा. तुंगत, ता. पंढरपूर) याने अतुल रणदिवे यांच्या शेतातील ऊसाच्या बांधालगत  सदर मतीमंद मुलीवर लैंगीक अत्याचार केले.  
अत्याचार घडुन दोन दिवस उलटले तरी देखील या गुन्ह्याची नोंद केली गेली नाही. कारण गावातील कांहीजणांकडूनहे  प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. सदर मुलीने कासेगावमधील आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. मुलीच्या कासेगाव (ता. पंढरपूर)  येथील  नातेवाईकांनी प्रकार समजताच  पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली व आरोपीविरुध्द फिर्याद दिली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद  झाली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे आवचर यांनी दिली आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *