👁 11 Views

पंढरपूर- पोटच्या गोळ्याला बेवारसासारखं सोडून पळुन गेलेल्या ‘त्या’ महिलेला जामीन मंजुर

 आईच्या मायाने व्याकुळ झालेल्या या  बाळाला महिला पोलिसांनी मायेची उब दिली

Pandharpur Live : 
पंढरपूर – चौफाळा येथील श्रीकृष्णाच्या मंदिराजवळ पोटच्या गोळ्याला सोडून पळुन गेल्याच्या गुन्ह्यातील सदर महिलेला पंढरपूर येथील न्यायालयात हजर कले असता तिचा जामीन मंजुर करण्यात आला. आरोपीच्या वतीने  
अ‍ॅड. किर्तीपाल सर्वगोड यांनी युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरत पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश मे. सरोदे यांनी जामीन मंजूर केला.
आपल्या दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाल सोडून सदर महिलेने पलायन केले होते. पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिरा जवळ शुक्रवारी (ता. 10) सदर महिलाआपल्या दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाला घेऊन बराच वेळ बसली होती. मात्र तिच्या मनात वेगळचं काही तरी सुरू होतं. बराच वेळ बसल्यानंतर कठोर झालेल्या या महिलेने जवळच असलेल्या एका दुकानदाराकडे आपल तान्हुलं बाळ सोपवून लघुशंका करून येते, अशी बतावणी केली व पलायन केले. दुकानदार सचिन व्यवहारे यांनी त्या अनोळखी महिलेची बराच वेळ वाट पाहिली. परंतु ती महिला बाळ सोडून गेल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज वाडेकर, धैर्यशील काळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती देवून बाळ महिला पोलिस प्रियंका मोहिते, सोनाली इंगोले आणि पोर्णिमा हादगे यांच्याकडे सुपुर्त केले.

सकाळपासून भुकेने आणि आईच्या मायाने व्याकुळ झालेल्या या  बाळाला महिला पोलिसांनी मायेची उब दिली. त्यानंतर बाळाच्या चेहर्‍यावर कुठे हास्याची लकेर उमटल्याचे पाहायला मिळाले. सर्व शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर या बाळाला येथील नवरंगे बालकाश्रमात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात महिले विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. डी.वायएस.पी. डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अखेर या महिलेचा शोध लावुन ताब्यात घेतलं सदर महिलेला न्यायालयात हजर केले असता अ‍ॅड. किर्तीपाल सर्वगोड  यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायमुर्तींनी तिचा जामीन मंजुर केला.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *