👁 8 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन


पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुरक्षा या विषयावर मोटार वाहन निरीक्षक अशोक खेनट यांचे मार्गदर्शन संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन. डॉ. रवींद्र व्यवहारे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी व सोलापूर मोटार वाहन निरीक्षक अशोक खेनट यांचे उपस्थितीमध्ये झाले. दरम्यान मोटार वाहन निरीक्षक अशोक खेनट यांचे महाविद्यालयाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
   या बोलताना अशोक खेनट म्हणाले, अलिकडच्या काळात जीवन जगणे खूप धावपळीचे झाले आहे. अशा धावपळीच्या वेळी आपण प्रवास करत असताना वाहतुकीचे नियम अमलात आणणे खूप गरजेचे आहे. वास्तविक पाहता हे नियम आपल्यासाठीच असुन आपल्या संरक्षणासाठी आहेत हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे. प्रवास करीत असताना वाहतुकीचे नियम पाळले तर अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल यात शंका नाही.
   वाहन चालवित असताना प्रत्येक व्यक्तीने हेल्मेट चा वापर, सुरक्षा बेल्ट वापर, मद्यपान न करणे, वाहन चालवताना मोबाईल चा वापर न करने, वेग मर्यादा सांभाळणे, स्वतःच्या मनावर संयम ठेवून वाहन चालविले तर अपघाताचे प्रमाण खुपच कमी होईल यात शंका नाही असे मत सोलापूर येथील मोटार वाहन निरीक्षक अशोक खेनट यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा या विषयावर बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी उद्धव शिंदे यांनी केले.

फोटो ‘पंढरपुर सेकंड मध्ये वाहतूक सुरक्षा या विषयावर बोलताना मोटार वाहन निरीक्षक खेनट समोर उपस्थित विद्यार्थी वर्ग

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *