👁 11 Views

पंढरपूर रेल्वे स्टेशन शेड जवळ अनोळखी व्यक्तीचा मृत्यू



Pandharpur Live-

पंढरपूर.21–  पंढरपूर रेल्वे स्टेशन येथील शेड जवळ एक अनोखळी व्यक्ती  जुनाट   अजाराने  मयत झाली  आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे, आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.
          या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 75 वर्षे असून, उंची 5 फुट 4 इंच, वर्ण काळा-सावळा, अंगाने साधारण, चेहरा गोल, नाक बसके, केस सफेद, अंगात निळसर रंगाचे जॅकेट, पांढरा मळकट शर्ट व सफेद मळकट पायजमा असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे.
संबधीतांनी  तसेच ओळखीच्या व्यक्तीने  याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *