👁 14 Views

Pandharpur – सिंहगड मध्ये उद्या “सिंहगड टेक्नीकल सिम्पोझियम-२०२०” चे आयोजन

Pandharpur Live-            

○राज्यस्तरीय विंग्ज-२०२०, बेस्ट बिझनेस प्लॅन, रेझोन्नस-२०२० स्पर्धा तर १०१ बाॅलपेन स्केच चे प्रदर्शन होणार

 पंढरपूर (प्रतिनिधी):

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात २९ फेब्रुवारी रोजी “सिंहगड टेक्नीकल सिम्पोझियम-२०२०”चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील वेबशार कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुभाष लेंगरे सह टीम, टी. ई. कनेक्टिव्हिटी कपंनीचे संचालक शिवाजी कुपटे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कला शिक्षक भारत गदगे, कलाकार जोतिराम काटकर, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

       विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी, त्यांच्या अंगभूत असलेल्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचे २९ फेब्रुवारी रोजी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

       या नंतर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग, सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग आदी विभागात राज्यस्तरीय विंग्ज-२०२०, बेस्ट बिझनेस प्लॅन, रेझोन्नस-२०२० स्पर्धेत विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले जाणार असुन जोतिराम काटकर यांनी रेखाटलेल्या १०१ बाॅलपेन स्केच चे प्रदर्शन होणार आहे.

   राज्यस्तरीय स्पर्धेत  महाविद्यालयातील तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना वापरून तयार केलेले प्रकल्प सादर होणार आहेत.

       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. महेश कुलकर्णी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *