👁 13 Views

सोलापूरातील युवा महोत्सवामध्ये स्वेरीला सर्वसाधारण विजेतेपद

सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशालेत झालेल्या युवा महोत्सवामध्ये  स्वेरीला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांसह डावीकडून क्रीडा समन्वयक प्रा. आर. डी. सोळगे, क्रीडा सचिव अक्षय माने, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार,  स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार.
  सांघिक व वैयक्तिक स्वरूपात एकूण २५ पुरस्कार
Pandharpur Live-

पंढरपूर- सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशाला येथे पार पडलेल्या अभियांत्रिकी युवा महोत्सवामध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.
         ‘स्वेरी’ महाविद्यालय हे विद्यार्थी प्रवेश संख्येत, वार्षिक परीक्षेच्या निकालात आणि प्लेसमेंटमध्ये अनेक वर्षापासून अग्रेसर आहे. आता स्वेरी महाविद्यालयाने सोलापुरात झालेल्या ‘युवा महोत्सवामध्ये आघाडी मारल्यामुळे विजेत्या स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या महोत्सवात स्वेरीला  सांघिक व वैयक्तिक स्वरुपाची तब्बल २५ पारितोषिके मिळाली. 

यामध्ये वैयक्तिक स्पर्धेत मिळालेली पारितोषिके पुढील प्रमाणे निबंधलेखनामध्ये आकाश शिंदे (प्रथम- द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल) मेहंदी, रांगोळी, आणि अॅप्टि क्वीज या तीनही स्पर्धेत पौर्णिमा निकते (द्वितीय-तृतीय वर्ष यांत्रिकी) तसेच हेअर स्टाईल स्पर्धेत विशाल शिंदे (द्वितीय–द्वितीय वर्ष संगणक) फ्लावर डेकोरेशन स्पर्धेत सचिन इंगळे (प्रथम –अंतिम वर्ष यांत्रिकी) सलाड डेकोरेशन स्पर्धेत सचिन इंगळे ( द्वितीय–अंतिम वर्ष यांत्रिकी) गिफ्ट रॅपिंग स्पर्धेत योगिता मस्के (द्वितीय–अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) कविता स्पर्धा स्पर्धेत काव्यांजली मंगरुळे (प्रथम– द्वितीय वर्ष सिव्हील) ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुमित पवार (द्वितीय– द्वितीय वर्ष सिव्हिल) शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत शीतल ताटे (तृतीय- द्वितीय वर्ष सिव्हिल) तर सांघिक स्पर्धेत अॅटोकॅड स्पर्धेत सिद्धेश्वर खपाले आणि संघ (प्रथम) कटीया वॉरमध्ये प्रज्वल मुसळे आणि संघ (तृतीय) रोबोवॉर आरती लाळे आणि संघ (प्रथम) हेरिटेज वॉक अँड क्वीज कॉम्पीटीशनमध्ये शिवानी कोठावळे आणि संघ (प्रथम) आणि याच स्पर्धेत पौर्णिमा निकते आणि संघ (तृतीय) पथनाट्य स्पर्धेत जितेंद्र पाटील आणि संघ (प्रथम), रस्सीखेच मध्ये प्रज्वल खडके व प्रदीप साठे आणि संघ (प्रथम) कबड्डीमध्ये शीतल ताटे आणि संघ (द्वितीय), बुद्धीबळमध्ये आरती लाळे आणि संघ (द्वितीय), कॅरममध्ये मुकुल पाटील आणि संघ (प्रथम) तसेच कॅरममध्ये आरती लाळे आणि संघ (द्वितीय) ४०० मीटर रिलेमध्ये शीतल ताटे आणि संघ (द्वितीय), वादविवाद स्पर्धेत प्रशांत माळी आणि संघ (प्रथम) असे यश मिळविले.

 विजेत्यांना स्मृतिचिन्ह, पदके आणि प्रमाणपत्रे देवून युवा महोत्सवाचे आयोजक डॉ. एन. एस. काटीकर, राहुल उळागड्डी व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील, क्रीडा समन्वयक प्रा. आर. डी. सोळगे व क्रीडा सचिव अक्षय माने, प्रा. पी.के. मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकरसंस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी संचलित इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापकशिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *