👁 6 Views

कोरोनाचा कहर वाढतोय! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 400 ; 19 जणांचा मृत्यु

Pandharpur Live Online-
महाराष्ट्रात आतापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण रुग्णांची संख्याही 400 पार झाली आहे. आज एकूण 81 नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या 335 वरून थेट 416 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबई 57, नगर 9, ठाणे 5 आणि बुलढाण्यामध्ये 1 रुग्ण सापडला आहे. तर गेल्या काही दिवसांत केवळ तीनच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकून बरे होऊन घरी जाणार्‍या रुग्णांची संख्या 42 झाली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

24 तासात देशात ’कोरोना’चे 328 नवे रूग्ण आढळले असून त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे आणि ही संख्या 2000 च्या जवळपास पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 50 पर्यंत पोचली आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची सख्या 416 वर पोहचली आहे. तर मुंबईत कोरोनामुळे 24 तासात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीती वाढत असून प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हजारो झोपड्या असलेल्या धारावीत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वात जास्त 9 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरात मध्ये 6 , कर्नाटक 3, मध्य प्रदेशात 3, पंजाबमध्ये 3, तेलंगणात 3, पश्चिम बंगालमध्ये 3, दिल्लीत 2, जम्मू-काश्मीरमध्ये 2, उत्तर प्रदेशात 2 आणि केरळमध्ये 2, तर तामिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एकाच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबईत 57 ठाण्यात 5, नगरमध्ये 9 आणि बुलढाण्यात 1 अशा 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली हे अद्याप समजू शकले नाही. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरात देखील कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 5 नवे रुग्ण आढळले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज 5 नवे रुग्ण आढळून आल्याने महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे. सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी 4 रुग्ण पूर्व भागातील तर 1 रुग्ण कल्याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील 3 रुग्ण हे लग्न सोहळ्याशी संबंधीत आहेत तर 1 जण कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने त्याला संसर्ग झाला आहे. या सर्व रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पालिकेकडून हेल्पलाइन नंबर जाहीर
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधाव तसेच अधिक माहितीसाठी बाई रुक्मीणीबाई रुग्णालयात, कल्याण येथील 0251-2310700 आणि शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली येथील 0251 – 2481073 आणि 251 – 2495338 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज सापडलेले कोरोना पॉझिटिव्ह रुण
मुंबई – 57
पुणे – 6
पिंपरी-चिंचवड – 3
ठाणे – 5
अहमदनगर – 9 (एकूण 14)
बुलडाणा – 1
वसई – 1

हिंगोली – 1

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *