भेटी लागी जीवा लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन,
तैसे माझे मन वाट पाही ॥१॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली,
पाहतसे वाटूली पंढरीची ॥२॥
भुकेलिया बाळा अति शोक करी
वाट पाहे परी माऊलीची.
तुका म्हणे मज लागलीसे भूक,
धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥