Pandharpur Live Online- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधिताचा आकडा ७४८ वर येवून पोहोचला आहे. एकट्या मुंबई ८१, पुणे १८, औरंगाबाद ४ अहमदनगर ३, कल्याण-डोंबिवली २, ठाणे २, उस्मानाबाद १, वाशी १, इतर १ असे मिळून आज (५ एप्रिल) ११३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ५६ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
Video- विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची पुणे विभागातील कोरोना रुग्णाच्या सद्यस्थिती बाबत माहिती
महाराष्ट्रातील आकडेवारी –
|
अ.क्र.
|
जिल्हा
|
बाधित रुग्ण
|
मृत्यू
|
|---|---|---|---|
|
1.
|
मुंबई
|
458
|
30
|
|
2.
|
पुणे (शहर व ग्रामीण)
|
100
|
05
|
|
3.
|
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा व जिल्हे
|
82
|
06
|
|
4.
|
सांगली
|
25
|
00
|
|
5.
|
अहमदनगर
|
21
|
00
|
|
नागपूरआणि
|
17
|
00
|
|
|
6.
|
लातूर
|
08
|
00
|
|
औरंगाबाद
|
07
|
01
|
|
|
7.
|
बुलडाणा
|
05
|
01
|
|
8.
|
यवतमाळ आणि उस्मानाबाद
|
प्रत्येकी 04
|
00
|
|
9.
|
सातारा
|
03
|
00
|
|
10.
|
कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव
|
प्रत्येकी 02
|
01(जळगाव)
|
|
11.
|
नाशिक,अमरावती, सिंधुदुर्ग, गोंदिया,वाशिम, हिंगोली
|
प्रत्येकी 01
|
01(अमरावती)
|
|
12.
|
इतर राज्य – गुजरात
|
02
|
00
|
|
एकूण
|
748
|
45
|
दरम्यान, आज दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ झाली. त्याचबरोबर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. यात मुंबई ८, पुणे ३, औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रत्येकी १ जण दगावला आहे. यामुळे आता राज्यात कोरोनामुळे एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या ३ हजार ५७७ वर पोहोचली तर ८३ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गेल्या २४ तासात देशभरात ५०५ नवी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.


