लॉकडाऊन 15 एप्रिलनंतर पुर्णपणे शिथील नाही 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन अशी शक्यताही कमी आहे. कारण 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन 100 टक्के शिथील होईल असं कुणीही गृहीत धरु नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
Posted inMaharashtra
राज्यातील मृतांचा आकडा 5 टक्क्यापेक्षा जास्त… ही आकडेवारी अपेक्षेपेक्षा जास्तच- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई | राज्यात मृतांची संख्या आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आम्ही 2.5 ते 3 टक्के मृतांचा आकडा अपेक्षित करत होतो. मात्र मृतांचा आकडा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मृतांचा आकडा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याबाबत आज बैठक घेवून डॉक्टरांची हाय पावर समिती गठित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का, याबाबत ही समिती अभ्यास करेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकार आता पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट, व्हेंटिलेटर आणि एन 95 मास्क खरेदी करु शकणार नाही. केंद्र सरकार स्वतः संबंधित सर्व साहित्य खरेदी करुन राज्यंना पुरवणार आहे, असं केंद्राने राज्याला कळवलं असल्याचं टोपेंनी सांगितलं आहे.
राज्य सरकारने केंद्राकडे 2 हजार 125 व्हेंटिलेटर, 8 लाख 41 हजार एन 95 मास्क, 3 लाख 14 हजार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची मागणी केली आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

