👁 10 Views

कोरोना विषाणु – राज्यात 120 नवीन रुग्णांची नोंद महाराष्ट्रातील एकुण रुग्णसंख्या 868

Pandharpur Live Online

मुंबई : राज्यात सोमवारी कोरोनाच्या १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ८६८ झाली आहे. ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सोमवारी आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्य ५२ झाली आहे.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

आज राज्य में 120 नए मामले सामने आए हैं और 7 मौतें हुईं हैं; महाराष्ट्र में पॉजिटिव मामलों की कुल संख्या 868 है, अभी तक 52 मौतें हुई हैं: महाराष्ट्र स्वास्थ्य विभाग


दरम्यान, सोमवारी राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५२ झाली आहे.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशीलः

मुंबईः ५२६ (मृत्यूः ३४)


पुणेः (शहर व ग्रामीण भाग)- १४१ (मृत्यूः०५)

सांगलीः २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपाः ८५ (मृत्यूः ०९)
नागपूरः १७
अहमदनगरः २३
यवतमाळः ४
उस्मानाबादः ३
लातूरः ८
औरंगाबादः १० (मृत्यूः०१)
बुलढाणाः ५ (मृत्यूः ०१)
साताराः ५
जळगावः २ ( मृत्यूः ०१)
कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिकः प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशीम, अमरावती (मृत्यूः०१), 
हिंगोली, जालनाः प्रत्येकी १
इतर राज्यः २

एकूणः ८६८ मृत्यूः ५२

मृत्यूंची कारणमीमांसा अशीः राज्यात रविवारपर्यंत झालेल्या ४५ मृत्यूंच्या विश्लेषणातून पुढील महत्वपूर्ण निष्कर्ष निघतात-

-एकूण मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण (७३ %) एवढे आहे.


-४५ वर्षाखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून साधारणपणे म्हणजे ६०% मृत्यू हे ६१ वर्षावरील व्यक्तींचे आहेत.

-कालपर्यंत झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी साधारणपणे ७८ टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते.
६० वर्षांवरील आणि मधुमेह – उच्च रक्तदाब असे आजार असणा-या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता या विश्लेषणातून अधोरेखित झाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *