Pandharpur Live- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे. या कालावधीत सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात कायद्याचा भंग केल्याप्रकरणी 519 गुन्हे दाखल केले असुन 2242 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. 1847 वाहनं जप्त केली असुन कायद्याचा भंग करणारांवर कडक कारवाई सुरुच राहील अशी माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
Video
जिल्ह्यात लॉकडाऊनला नागरिकांनी व ग्रामस्थांनी उत्कृष्ट प्रतिसाद उकृष्ट दिलाय, याबद्दल जनतेचे धन्यवाद. सर्वांनी सोशल डिस्टंग्सीन्सचा योग्य तो वापर करावा असे केल्यास सोलापूर जिल्हा आजपर्यंत जसा कोरोनामुक्त राहिला तो तसाच राहील. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी श्रीविठ्ठल मंदिरात बंद च्या काळात पहाटे कांहीजणांनी पुजा करुन कायद्याचे उल्लंघण केल्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भातही त्यांनी अधिक माहिती दिली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते.

