👁 8 Views

लॉकडाऊन चे उल्लंघन- 19 जणांवर पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई 17 मोटारसायकल जप्त


पंढरपूर लाईव्ह: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू असुनही काहीजण आपले मॉर्निंग वॉकचे रूटीन थांबवु शकले नाहीत. पंढरपूर तालुक्यातील टाकळी रोड परिसरात मॉर्निंग वॉक करणा-या अशा 12 जणांवर व विनाकारण फिरणा-या 7 जणांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. 
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत  टाकळी रोड वर मॉर्निंग वॉक करणारे 12 जणां वर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68, 69 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच इतर 7 जणांसह अशा एकूण 19 जणांवर कारवाई केली आहे. एकुण 17 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *