गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करताना आ.प्रशांत परिचारक, प्राचार्या सौ. शैला कर्णेकर,
रजिस्ट्रार गणेश वाळके, शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ.
Pandharpur Live : देशभरात संचार बंदी सुरु आहे अत्यावश्यक सेवा सुरु असल्या तरीही अनेक कुटुंबांना रोजी रोटीची चिंता भेडसावत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांना दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे कामगार वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्शभुमीवर शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसह मजुरांची उपासमार होऊ नये पंढरपुर शहरातील कर्मयोगी विद्यानिकेतन स्कूल(सेमीइंग्लिंश) येथील प्राचार्या, रजिस्ट्रार, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ यांनी आपल्या पगारातील काही रक्कम परप्रांतिय व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात देऊन सहकार्य केले. दि.०९ एप्रिल २०२० सकाळी ११ वाजता आ.प्रशांत परिचारक यांचे ह्स्ते कामगार वर्गाला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यामध्ये तांदूळ, साखर, तूरडाळ, गोडतेल, गहु-आटा, चहा-पावडर, काळे-तिखट, मोहरी, कांदा, बटाटा, कोथिंबीर आदि साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार गणेश वाळके, शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता.



