👁 6 Views

धक्कादायक… सोलापूर मधील मृत व्यक्तीचे रिपोर्ट आढळले पॉझिटीव्ह…Video- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली महत्वपुर्ण माहिती

सोलापूर येथील जोडबसवण्णा चौक सील.            कोरोनाच्या लढयासाठी सोलापूर प्रशासन सज्ज.                           औषध साठा हॉस्पिटलची यंत्रणा सज्ज.

पंढरपूर  लाईव्ह- संपूर्ण महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते परंतु शेजारील सोलापूर जिल्हा मात्र कोरना मुक्त होता. अखेर सोलापूरातही कोरोना बाधीत रुग्ण होता अशी धक्कादायक माहिती आज उघड झाली आहे. सोलापूरातील पाश्‍चा पेठ येथील एका मयत किराणा दुकानदार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर हा अहवाल यंत्रणेच्या हाती पडल्यामुळे गांभीर्य अधिकच वाढले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी अधिक माहिती देत जिल्ह्यातील कोरोना विषाणुच्या प्रतिबंधाबाबत केलेल्या उपाययोजनाबाबत अधिक माहिती दिलीय. 

Video- 
रविवारी दुपारपासून जोडबसवन्ना  चौकातील प्रार्थनास्थळ परिसरात पोलिसांच्या महसूल अधिकारी यांच्या गाड्यांचा ताफा आला तशी याठिकाणी लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. डॉक्टरांची टीम ही घटनास्थळी दाखल झाली दरम्यान या प्रार्थनास्थळ जवळील एका किराणा दुकानदाराचा नुकताच मृत्यू झाला असून त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्या मुळे यंत्रणा खडबडून जागी झाली सदर किराणा दुकानदार गेल्या काही दिवसापासून कोणा कोणाच्या संपर्कात आला होता याची चौकशी पोलीस खाते कसोशीने करत आहे तर संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला डॉक्टरांच्या ताब्यात दिले जात आहे पुढील14 दिवसासाठी या किरण दुकानदाराशी संबंधित परिसर सील करण्यात आला असून त्याच्या संपर्कात आलेल्यांना सर्वांनाच क्वारंटाईन केले जाईल अशी माहिती मिळाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *