👁 8 Views

राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आरुणा गॅस एजन्सी यांचेकडून परराज्यातील कामगारांसाठी कपड्यांच्या साबणांचे बॉक्स सुपूर्त

Pandharpur Live- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीत अडकुन पडलेल्या परराज्यातील कामगारांना पंढरपूर येथील संत केंद्रे महाराज धर्मशाळेमध्ये कर्नाटक तामिळनाडू व आंध्र प्रदेशातील काही कामगार म्हणजेच आता साधारणतः सहाशे ते सातशे कामगारांना तेथे दररोज प्रशासनाकडून म्हणजेच उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून जेवण दिले जाते. व इतर सुविधा पुरविल्या जातात यासाठी माननीय उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आरुणा गॅस एजन्सी यांच्या वतीने कपड्यांच्या साबणांचे बॉक्स प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

यावेळी राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख  ओंकार  बसवंती, राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव तथा शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ.आरतीताई ओंकार बसवंती, आरुणा गॅस एजन्सीचे किरण शिंदे, शिवसैनिक देविदास धट, अमृता वेदपाठक आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *