Pandharpur Live-
पुणे विभागात आज 4:30 वाजेपर्यंत एकुण 404 कोवीडच्या रुग्णांची नोंद झालेली आहे; पैकी आजपर्यंत 47 रुग्णांचा मृत्यु- झाला आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय.
एकुण मृत्यु झालेल्या रुग्णांची आकडेवारी
पुणे- 44
सातारा-2
सोलापूर- 1
पुणे ससुन मधील पहिल्या पेशंटचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेमुळे सदर पेशंटला डिस्चार्ज दिला आहे.
पुणे शहरात संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एकुण 463 रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे शहर विभागनिहाय रुग्णांची आकडेवारी
पीएमसी -389
पिंपरी चिंचवड – 46
ग्रामीण – 28
पुणे शहरात आज एकुण रुग्णसंख्या 378 झाली असुन, 42 जणांना डिस्चार्ज दिलाय तर 44 रुग्णांचा मृत्यु झालाय.
पुणे विभागातील आकडेवारी
सातारा -11 रुग्णांपैकी दोघांचा मृत्यु झाला असुन एकाला डिस्चार्ज दिला आहे, एकुण 8 अॅक्टीव्ह केसेस आहेत.
सोलापूर- 12 रुग्णांपैकी 1 मृत्यु झाला असुन एकुण 11 अॅक्टीव्ह केसेस आहेत.
सांगली – 26 रुग्णांपैकी 25 जणांना डिस्चार्ज दिला असुन 1 अॅक्टीव्ह केस आहे.
कोल्हापूर – 6 रुग्ण आहेत.
पुणे विभागात एकुण 68 जणांना डिस्चार्ज दिला असुन 11 रुग्ण क्रिटीकल आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय.

