👁 16 Views

सोलापूर- कोरोना बाधितांच्या संख्येत होतीय लक्षणीय वाढ… शहर आणि जिल्ह्यामध्ये ६६ ठिकाणी नाकाबंदी



पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- दि. 23 एप्रिल 
सोलापुरात आज करोनाबाधित नवे चार रूग्ण आढळून आले. मागील 11 दिवसांत रूग्णांची एकूण संख्या ३७ झाली आहे. यात तीन मृतांचा समावेश आहे.


सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या कामात मदत करणे, नाकाबंदी अथवा तपासणी मोहीम व बंदोबस्तासाठी काही तरुणांची मदत घेण्यात येणार आहे. स्वयंस्फूर्तीने तरुणही पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पन्नासहून अधिक तरुण किंवा त्यापेक्षा जास्त पोलिस मदतीसाठी मदत येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

याशिवाय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गल्लीबोळ परिसरात तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी परिसर सील केलेला आहे त्या परिसरातही तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. एकूण शहर आणि जिल्ह्यामध्ये ६६ ठिकाणी नाकाबंदी आहे.
शहरात किंवा जिल्ह्यात कोणीही अनधिकृतपणे प्रवेश करू नये म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. शहरांमध्ये दोन हजार गुन्हे दाखल असून त्यात चारहजार व्यक्तींचा समावेश आहे. ग्रामीण भागांमध्ये ८८४ गुन्हे दाखल आहेत. ग्रामीण पोलिसांनी ५०६२ आसपास वाहने जप्त केले आहेत. तर शहरात साडेसात हजारांच्या आसपास वाहने जप्त करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. हिंदुस्थान समाचार

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *