👁 7 Views

केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय… मॉल्स वगळून देशभरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी.. कोणती दुकाने, कधी खुली होणार? याचा निर्णय राज्यसरकार घेणार!

 कोणती दुकानं सुरू करायची याचा अधिकार राज्य सरकारकडे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 

केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, छोट्या दुकानदारांना मान्यता देण्यात आली असली, तरी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ५० टक्के कर्मचारीच कामावर आणि सोशल डिस्टंन्सिगचे पालन करणे या अटींसह दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू असणार नाही.
आज (ता.२५) सकाळपासून हा आदेश लागू होईल. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. त्याचवेळी शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मार्केट कॉम्प्लेक्समधील दुकाने बंदच राहतील.परंतुप महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राबाहेरील मार्केट कॉम्प्लेक्समधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सिंगल ब्रॅण्ड आणि मल्टीब्रॅण्ड मॉल्समधील दुकाने उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. महानगरपालिका, नगर पालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोनमधील कोणतीही दुकानेही लॉकडाऊन काळात बंदच रहातील. हा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्रीच सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकांना पाठवला आहे.

गृहमंत्रालयानं शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार देशातील सर्व दुकानं काही अटींवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान करोना व्हायरचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या तसंच हॉटस्पॉट असेलेल्या ठिकाणांमध्ये मात्र दुकानं उघडी ठेवता येणार नाहीत. याव्यतिरिक्त मद्य विक्रीची दुकानं तसंच मॉल्स सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत येणाऱ्या दुकांनांनाच सुट देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकानं ही एक्ससाइज कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे ही दुकानं बंदच राहणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *