👁 8 Views

पंढरीतील सोनाली जाधव यांची नॅशनल युथ कौन्सिलच्या तालुकाध्यक्षपदी निवड


Pandharpur Live-   
पंढरपूरमधील सोनाली जाधव यांची नॅशनल युथ कौन्सिलच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जाधव यांचे उच्चस्तरीय कर्तृत्व तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्य पाहता त्यांची निवड करण्यात आली आहे.
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

नुकतेच त्यांना निवडीचे पत्र कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तचना मूर्ती रामू व राज्याध्यक्ष डॉ. त्रिविनिकुमार कोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
                   आपल्या निवडीबद्दल बोलताना सोनाली जाधव म्हणाल्या की, ‘‘मी या पदाच्या सर्व जबाबदारी आणि माझी सर्व कर्तव्य उत्तमरितीने पार पाडेन. राज्य स्तरीय संघटन मजबूती करण्यावर आणि तालुकानिहाय विस्तार यासाठी माझी प्राथमिकता राहील. वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास मी सार्थ करुन दाखवीन व माझ्यावर सोपविलेली जबाबदारी एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे मी पार पाडीन.’’
                      या कौन्सिल मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील सोनाली जाधव यांनी यावेळी केले. या निवडीबद्दल सोनाली जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *